सोलापूर

आयुक्तांच्या निर्णयाकडे लक्ष, महापालिका सभांवर कोरोनाचे सावट

विजयकुमार सोनवणे

सोलापूर ः महापालिकेचे पुढील वर्षाचे धोरण ठरविणाऱ्या महत्त्वाच्या सभा या महिन्यात होत आहेत. मात्र त्यावर आता कोरोनाचे सावट आले असून, या सभा होणार की नाही याबाबत महापालिका आयुक्त निर्णय घेणार आहेत. 

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, कोणत्याही प्रकारचे सभा, समारंभ, सार्वजनिक कार्यक्रम घेऊ नयेत असे आवाहन केले आहे. अत्यंत महत्त्वाचे असेल तर त्यासंदर्भात महापालिका क्षेत्रात महापालिकेचे आयुक्त, तर ग्रामीण भागात तहसीलदार व मुख्याधिकाऱ्यांच्या परवानगीने असा सभांचे आयोजन करता येईल, असे स्पष्ट केले आहे. 

या सभांवर आहे कोरोनाचे सावट
महापालिका परिवहन समितीची अंदाजपत्रकीय सभा 17 मार्च, महापालिकेची नियमित सर्वसाधारण सभा 20 मार्च आणि अंदाजपत्रकीय सभा 30 व 31 मार्च रोजी बाेलावण्यात आली आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्यामुळे या सभांवर सावट येण्याची शक्यता आहे. 

पत्र मिळालेले नाही
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कार्यवाही ठेवण्यासंदर्भात महापालिका आयुक्त आदेश काढतील. त्यानुसार महापौरांचे पत्र येईल, त्यानंतर सभा घ्यायची की नाही हे ठरविले जाईल. तथापि अद्याप या संदर्भातील पत्र आमच्या कार्यालयास मिळालेले नाही.
- रऊफ बागवान, नगरसचिव
सोलापूर महापालिका 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

४०० धावांचा विक्रम का मोडला नाही? Wiaan Mulderने सांगितली मन जिंकणारी गोष्ट; म्हणाला, ब्रायन लारा..

प्रसिद्ध उद्योजकाची घराजवळ गोळ्या झाडून हत्या; सात वर्षांपूर्वी मुलावरही झाडल्या होत्या गोळ्या, दोघांचा कोणासोबत झालाय वाद?

Latest Maharashtra News Updates : एलबीएस मार्गावरील वाहतूक कोंडीने चाकरमान्यांचे हाल

Mobile Recharge : मोबाईल वापरकर्त्यांना झटका! रिचार्जचे दर 10-12% ने पुन्हा महागणार, कोणत्या कंपनीचे किती पैसे? जाणून घ्या..

11th Admission : इ. ११ वी प्रवेशाची दुसरी फेरी सुरू; पसंतीक्रम लॉक करण्यासाठी १० ते १३ जुलैची मुदत

SCROLL FOR NEXT