Koravli 
सोलापूर

आतापासूनच सुरू झाल्या कोरवली ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोधच्या हालचाली !

श्रावण तीर्थे

कोरवली (सोलापूर) : मोहोळ तालुक्‍यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका फेब्रुवारीमध्ये होण्याची शक्‍यता धरून, आतापासूनच कोरवली (ता. मोहोळ) येथील ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. 

कामती पोलिस स्टेशनचे नूतन पोलिस निरीक्षक अंकुश माने यांनी कोरवली ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्या अनुषंगाने त्यांनी गावातील सर्व प्रमुख पक्षांचे पदाधिकारी, पॅनेल प्रमुख व विद्यमान सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांची ग्रामपंचायत कार्यालयात बैठक बोलावून ग्रामपंचायत बिनविरोध करून गावाच्या विकासासाठी पाच वर्षांकरिता एकच सरपंच निवडावा; तसेच सर्व पक्षांनी एकोप्याने काम करावे, असे आवाहन केले आहे. त्यानुसार राजशेखर पाटील, डॉ. अमोल पाटील, सिद्धाराम म्हमाणे या तिन्ही पॅनेल प्रमुखांनी गावचे माजी सरपंच व ज्येष्ठ नेते चनबसवेश्वर म्हमाणे यांना सर्व उमेदवार व सरपंच बिनविरोध निवडण्याचे अधिकार दिले. त्यानुसार त्यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. 

बैठकीला कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, भाजप, वंचित बहुजन आघाडी व मनसे या पक्षांचे गावातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. 

निवडणुकीदरम्यान नातेसंबंध दुरावतात. गावात तणाव पसरतो व पैशाची उधळपट्टी होते. यासाठी गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध व्हाव्यात. 
- अंकुश माने,
सहाय्यक पोलिस निरीक्षक, कामती पोलिस स्टेशन 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT