crime.jpg 
सोलापूर

उळे गावाजवळ अवैध मळीसह आठ लाखांचा मुद्देमाल जप्त 

विजय थोरात

सोलापूरः सोलापूर-तुळजापूर महामार्गावर अवैद्य मळी वाहतूक करणारा टेम्पो पकडून त्यातील सात लाख 84 हजारांच्या 37 लोखंडी बॅरलसह 10 मे. टन मळी जप्त करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागाच्या भरारी पथकाने शुक्रवारी ही कारवाई केली. 
या प्रकरणी चालकास अटक करण्यात आली आहे. अवैद्य मळीची वाहतूक होणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार सोलापूर-तुळजापूर महामार्गावरील उळे गावाजवळ (ता. दक्षिण सोलापूर) येथे ही कारवाई करण्यात आली. सोलापूरहून तुळजापूरकडे (क्र. एम. एम. 13/ एक्‍स 4437) हा मळीने भरलेला ट्रक भरधाव वेगाने जात होता. पथकाने पाठलाग करुन त्याची चौकशी केली असता चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पथकाने ट्रकची पाहणी केली असता अवैध मळी वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. भरारी पथकाचे आयुक्त उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्कच्या उषा वर्मा, विभागीय उपायुक्त सुनील चव्हाण, विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे, अधीक्षक रवींद्र आवळे, उपअधीक्षक पवार, निरीक्षक लाड यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक प्रशांत निकाळजे, राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक मुंबईचे एम. एम. चव्हाण, जवान चेतन व्हनगुंटी, मलंग तांबोळी, गजानन होळकर यांनी ही कामगिरी केली. तपास दुय्यम निरीक्षक प्रशांत निकाळजे करीत आहेत.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SBI ATM Cash Charge: UPI नंतर आता ATM कॅश विड्रॉलवरही चार्ज! 1 ऑक्टोबरपासून नवा नियम

Mumbai News: 'लालबागचा राजा'च्या दरबारात दुर्दैवी घटना! मंडपाजवळ ६८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

'कोण होणार करोडपती' साठी डिझायनर साडीऐवजी पैठणीच का नेसली? माधुरी दीक्षितने दिलं खरं उत्तर, म्हणते-

Maharashtra Ganesh Visarjan Live: विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील गणरायाला भक्तिभावाने वाजतगाजत निरोप

Mukhyamantri Vayoshri Yojana : ‘वयोश्री योजने’चा थकलेल्या हातांना मोठा आधार जिल्ह्यात १७ हजार ज्येष्ठांना लाभ; प्रत्येकाच्या खात्यात तीन हजार रुपये वर्ग

SCROLL FOR NEXT