Crime_Scene 
सोलापूर

फायनान्स व भिशीचे आमिष पडले महागात ! गोड बोलून साडेआठ लाखांना फसवले 

तात्या लांडगे

सोलापूर : फायनान्स व भिशीच्या माध्यमातून जास्त फायदा होण्याचे आमिष दाखवून प्रवीण रामजी पुजारी (रा. लेप्रसी कॉलनी, जीवन विकास नगर, कुमठा नाका) यांना साडेआठ लाख रुपयांना फसविल्याप्रकरणी चौघांविरुद्ध जेलरोड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. 

लक्ष्मीकांत लक्ष्मीनारायण कुरापाटी, अंबिका कुरापाटी, पूजा कुरापाटी (सर्वजण रा. वरद फायनान्स, सत्तर फूट रोड), नागेश पाचकंटी असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. कुरापाटी हे पिग्मी गोळा करण्यासाठी येत असल्याने पुजारी यांची चांगली ओळख झाली. त्या ओळखीतून ही रक्‍कम पुजारी यांनी संबंधितांना दिली होती. काही दिवसांनी पुजारी यांना पैशाची गरज पडली आणि त्यांनी कुरापाटी यांच्याकडे पैशांची मागणी केली. मात्र, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. 

दुकानदाराची नजर चुकवून दुकानातून पळविला मोबाईल 
मोबाईल दुकानात मोबाईलचा स्टॉक लावत असताना दुकानदाराची नजर चुकवून चोरट्याने मोबाईल चोरून नेला. नितीन मोबाईल मॉल, नवी पेठेत ही घटना घडली आहे. या प्रकरणी सोमनाथ भीमाशंकर गायकवाड (रा. उत्तर कसबा, लोणार गल्ली) यांनी फौजदार चावडी पोलिसांत फिर्याद दिली आहे. फिर्यादी सोमनाथ यांचे लक्ष नसल्याचा फायदा घेऊन व नजर चुकवून चोरट्याने मोबईल चोरून नेला. या घटनेची नोंद फौजदार चावडी पोलिस ठाण्यात झाली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक श्री. पैकेकरी हे करीत आहेत. 

दारूच्या नशेत तरुणास केली लाकडाने मारहाण 
तू इथे का झोपलास, म्हणून लाकडाने मारहाण केल्याप्रकरणी सिद्धू भोसले (रा. रविवार पेठ) याच्याविरुद्ध जेलरोड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बापूजी साळुंखे हायस्कूलसमोर ही घटना घडली. सूरज दशरथ घोडके (रा. रविवार पेठ, बापूजी साळुंखे हायस्कूलसमोर) यांनी फिर्याद दिली. भोसले याने दारूच्या नशेत काही कारण नसताना शिवीगाळ करून मारहाण केली, असेही फिर्यादीत नमूद केले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक श्री. मोटे हे करीत आहेत. 

पाच लाख रुपये आण म्हणून विवाहितेचा केला छळ 
माहेरून पाच लाख रुपये घेऊन ये म्हणून विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पती विनोद पारीख, भगीरथ पारीख, शांताबाई पारीख, महेंद्रकुमार पारीख, अर्चना पारीख (सर्वजण रा. सद्‌गुरू समर्थ सोसायटी, कांचन नगर, शेळगी) यांच्याविरुद्ध जोडभावी पेठ पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पूजा विनोद पारीख यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. विवाहानंतर चार ते पाच महिन्यांनी सासरकडील मंडळींनी बिझनेस करण्यासाठी माहेरून पैसे आण म्हणून शिवीगाळ करून दमदाटी करत मारहाण केली. माहेरून पैसे आणले तरच नांदवणार म्हणून वारंवार मारहाण करीत होते, असेही फिर्यादीने पोलिसांना सांगितले. या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक श्री. दाईंगडे हे करीत आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 5 दिवसांतच 1 लाखाचे झाले 3 लाख! 300% रिटर्न देणाऱ्या शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल

आरक्षणावरून सुरू झाला वाद अन् कॉलेजमध्ये पेटलं वातावरण! कसा आहे ‘जयंती २’? वाचा Review

Hindi Medium Engineering: इंग्रजीची अडचण दूर! आता चक्क हिंदीतून सिव्हिल इंजिनिअरिंग; विद्यार्थ्यांना मिळणार रु. २ लाखांचे अनुदान

Latest Marathi News Live Update : राज्यात दुष्काळजन्य स्थिती, राज्यात ऑगस्ट महिन्यात ४६ टक्के तूट

Ganeshotsav 2026: हरतालिका अन् गणेश चतुर्थी एकाच दिवशी का? पूजा करण्याची योग्य वेळ कोणती? | Ganesh Chaturthi 2026

SCROLL FOR NEXT