सोलापूर : सोलापूर विभागातील सर्वच रेल्वे स्थानकांनी पर्यावरणपूरकतेची वाट धरली आहे. राष्ट्रीय हरित लवादाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सोलापूर विभागातील रेल्वे स्थानके पर्यावरण व्यवस्थापन प्रणालीत सर्वोत्कृष्ट ठरली आहेत. सोलापूर स्थानकास "एनएबीसीबी' या संस्थेकडून "आयएसओ' मानांकन मिळाले आहे. त्यानंतर आता विभागातील नगर, दौंड, कोपरगाव, लातूर, कलबुर्गी, साईनगर (शिर्डी), वाडी आणि कुर्डुवाडी या स्थानकांनाही ते मानांकन प्राप्त झाले आहे.
सोलापूर रेल्वे विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक प्रदीप हिरडे यांनी या स्थानकांचे मानांकन पत्र स्वीकारले. सोलापूर विभागातील सर्वाधिक नऊ स्थानकांनी आता "आयएसओ' मानांकन पटकाविले आहे. "एनएबीसीबी' या मान्यताप्राप्त संस्थेच्या माध्यमातून या स्थानकांचे लेखापरीक्षण पार पडले. स्थानकाच्या छतावर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण करणे, फ्लॅटफॉर्मवरील कव्हर शेडवर सौरऊर्जेचे पॅनेल बसवणे, प्लास्टिकमुक्त स्थानक बनवणे, यांत्रिकीकृत साफ-सफाईचा वापर करणे, कचऱ्याचे निर्मूलन, वॉटर ऑडिट, ऊर्जा ऑडिट, ध्वनिप्रदूषण, प्रवाशांना मिळणाऱ्या सोयी-सुविधा, बॅनर, पोस्टर्स, ऑडिओ - व्हिज्युअल अशा माध्यमांद्वारे प्रवाशांची होणारी जनजागृती या महत्त्वाच्या बाबींचा समावेश होता. या सर्वच पातळ्यांवर ही स्थानके यशस्वी झाली असून, त्यांनी मानांकन पटकाविले आहे.
तीन वर्षे निकषांचे पालन बंधनकारक
"आयएसओ' मानांकन मिळण्यापूर्वी संस्थेच्या अधिकाऱ्यांनी या आठ रेल्वे स्थानकांचे निरीक्षण केले. आता मिळालेले हे प्रमाणपत्र तीन वर्षांसाठी वैध असणार आहे. मानांकनप्राप्त सर्व रेल्वे स्थानकांना या काळात सर्व मानकांचे पालन करावे लागणार आहे. याबाबत संबंधित संस्था काही महिन्यांनंतर या स्थानकांचे लेखापरीक्षण करते. त्या वेळी निघालेल्या त्रुटींची माहिती विभागीय व्यवस्थापकांना देऊन त्याची पूर्तता केली जाते.
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.