एसटी संपामुळे लाखो विद्यार्थ्यांची बुडाली शाळा esakal
सोलापूर

एसटी संपामुळे आठ हजार पासधारक विद्यार्थ्यांची दमछाक!

एसटी संपामुळे आठ हजार पासधारक विद्यार्थ्यांची दमछाक!

विजय थोरात

एसटी बसमधून शाळेत जाणाऱ्या 8 हजार 194 पासधारक विद्यार्थ्यांची दमछाक होत आहे.

सोलापूर : कोरोना (Covid-19) रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे ऑफलाइन पद्धतीने शाळा (School) सुरू झाल्या आहेत. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांनी मागील एक महिन्यापासून संप पुकारला (ST Strike) आहे. त्यामुळे एसटी बसमधून शाळेत (Education) जाणाऱ्या 8 हजार 194 पासधारक विद्यार्थ्यांची (Students) दमछाक होत आहे. (Eight thousand pass holders students are being disadvantaged due to ST bus strike)

कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यामुळे शाळा, महाविद्यालये सुरू झाली आहेत. दिवाळीपूर्वी एसटीने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जवळपास आठ हजारांच्या घरात आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटीची वाहतूक बंद आहे. त्यामुळे खासगी प्रवासी वाहने गच्च भरून जीवघेणी वाहतूक करीत असून, विद्यार्थ्यांना एसटीचा संप मिटण्याची प्रतीक्षा आहे. दहावी, बारावीचे वर्ग सुरू होऊन महिना उलटला तरी एसटीअभावी अनेकांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. प्राथमिक शिक्षण घेण्यासाठी गावागावात शाळा आहेत; मात्र माध्यमिक शिक्षणासाठी अनेक गावांमधील विद्यार्थ्यांना आपल्या गावापासून जिल्ह्याच्या आणि तालुक्‍याच्या ठिकाणी जावे लागते. यासाठी शासनाच्या एसटी सेवेचा वापर करतात.

शाळा सुरू केली मात्र, एसटी बस कर्मचाऱ्यांच्या संपामुळे काही आगारातील ग्रामीण भागातून जाणाऱ्या बस मात्र अजूनही बंदच आहेत. दररोज प्रवास भाडे खर्च करून जाणे परवडणारे नसल्याने पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठवत नसल्याचेही चित्र आहे. ग्रामीण भागातून तालुक्‍याच्या ठिकाणी अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. यामध्ये 'आयटीआय'सह टंकलेखन प्रशिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांनाही एसटी महामंडळाच्या पासचा आधार असतो. परंतु, एसटी बंद असल्याने त्यांचेही हाल होत आहेत. एसटी कर्मचारी आंदोलनावर तोडगा निघत नसल्याने विद्यार्थी आणि पालक वर्ग चिंतेत आहे.

कोरोना नियमांची पायमल्ली

एसटी बस बंद असल्याने खासगी प्रवासी वाहतुकीला सुगीचे दिवस आले आहेत. त्यांना कोरोना काळात झालेल्या नुकसानाची भरपाई करण्याची संधी मिळाली असून, वाहनेही प्रवाशांनी गच्च भरून वाहतूक करीत आहे. यातील बहुतांश वाहनांमध्ये कोरोना नियमांची पायमल्ली होत असल्याचे पाहणीत दिसून आले.

आगारनिहाय पासधारक विद्यार्थ्यांची संख्या

  • सोलापूर - 1383, पंढरपूर - 608

  • बार्शी - 242, अक्‍कलकोट - 1253

  • करमाळा - 1238, अकलूज - 684

  • सांगोला - 1187, कुर्डुवाडी - 517

  • मंगळवेढा - 1082

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today : शेअर बाजाराची लाल रंगात सुरुवात मात्र काही मिनिटांतच तेजीत! कोणते शेअर्स वाढले?

MPSC Success Story: वीटभट्टी कामगाराच्या मुलाची जिद्दीने यशाला गवसणी; एमपीएससी परीक्षेतून बनला कृषी उपसंचालक, आई-वडीलांनी उपाशी राहून दिलं शिक्षण!

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! पाठ्यपुस्तकांबरोबर आता दफ्तरही मिळणार मोफत; ४२ लाख विद्यार्थ्यांना होणार फायदा

Latest Marathi News Update: बिल गेट्स यांचे आंध्र प्रदेशातील गन्नवरम विमानतळावर आगमन

Kolhapur Crime : आठ दिवस भीतीत, सोने विकल्यानंतर बिनधास्त; अखेर पंचवीस दिवसांनी संशयित पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT