MLA Shahajibapu Patil Sakal
सोलापूर

आमदार शहाजीबापू म्हणतात 'मी नाराज नाही'

एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांची वर्णी न लागल्यामुळे सांगोल्यातील बापू समर्थकांमध्ये मोठी निराशा निर्माण झाली आहे.

दत्तात्रय खंडागळे

एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांची वर्णी न लागल्यामुळे सांगोल्यातील बापू समर्थकांमध्ये मोठी निराशा निर्माण झाली आहे.

सांगोला - एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांची वर्णी न लागल्यामुळे सांगोल्यातील बापू समर्थकांमध्ये मोठी निराशा निर्माण झाली आहे. दुष्काळी सांगोला तालुक्याला तब्बल 20 वर्षानंतर मंत्रीपदाच्या दुष्काळाशी सामना करावा लागत आहे. कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असली तरी आमदार शहाजी पाटील नाराज नसल्याचे सांगत आहेत.

'काय झाडी, काय डोंगार...ओकेच' या डायलॉग बाजीमुळे संपूर्ण देशभर प्रकाश झोतात आलेले सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात समावेश होईल अशी आशा त्यांच्या समर्थकांमध्ये मोठी होती. तालुक्यातील त्यांचे अनेक समर्थक मंत्री पदाबाबत उघडपणे बोलून दाखवीत होते, तर अनेकांनी त्यांच्या मंत्रिपदाबाबत पैजाही लावल्या होत्या. शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीत सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील हे सुरुवातीपासून शिंदे यांच्या सोबत होते. शिवसेनेतील सोलापूर जिल्ह्यातील एकमेव आमदार म्हणून त्यांची ओळख निर्माण झाल्यामुळे व त्यातच ते उद्धव ठाकरे यांची साथ सोडून त्यांनी शिंदे यांचा हात हाताशी धरला होता.

या अगोदर महाविकास आघाडीच्या सरकार असताना आमदार शहाजी पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्याकडून तालुक्यासाठी अनेक मोठी कामे करून घेतली होती. त्यामुळे आमदार पाटील व शिंदे यांची घनिष्ठ संबंध असल्याचे यावरून लक्षात येत होते. मुख्यमंत्री शिंदे यांच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात आमदार शहाजी पाटील यांना मंत्रीपदाची लॉटरी लागेल असे सर्वत्र बोलले जात होते, परंतु तसे झाले नाही. याबाबत आमदार शहाजी पाटील हे नाराज नसल्याचे सांगत असले तरी त्यांच्या समर्थकांमध्ये मात्र नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

मी नाराज नाही

माझा मंत्रिमंडळ विस्तारामध्ये मंत्री म्हणून समावेश नसल्याने मी मुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्याबाबत कोणत्याही प्रकारचा नाराज नाही. मुख्यमंत्री शिंदे यांनी मला मोठी जबाबदारी देणार असल्याचे सांगितले असल्याने मला त्यांनी कोणतीही जबाबदारी दिली तरी मी ती यशस्वीपणे पार पाडेन

- शहाजी पाटील, आमदार, सांगोला.

तालुक्याला 20 वर्षे मंत्रीपदाचा दुष्काळ -

सन 1999 ते 2002 मध्ये आघाडी सरकारमध्ये असताना शेकापचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय गणपतराव देशमुख हे पणन व रोजगार हमी खात्याचे मंत्री होते. त्यानंतर सांगोला तालुक्याला अद्याप मंत्रीपद मिळू शकले नाही. गेली 20 वर्षे झाले सांगोला तालुका हा जिल्ह्यात अनेक कारणांनी प्रकाशझोतात असला तरी मंत्रीपदापासून दूरच राहिला आहे. सध्या जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव आमदार असलेले शहाजी पाटील यांना मंत्रीपदाची अशा निर्माण झाली होती. परंतु पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यामध्येही निराशा आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Chairman Salary: Tata Sons च्या चेअरमनला किती पगार मिळतो? नोएल टाटांच्या विरोधानंतर पद पुन्हा चर्चेत; आकडा पाहून धक्का बसेल!

Akola News : जिल्हाधिकाऱ्यांनी सोडले शेतकऱ्यांना वाऱ्यावर; महाबीज प्रशासनाकडून माहिती देण्यास नकार, एमडींनीही केले हात वर

Ai+ Nova 2 Power 5G भारतात लाँच! 16,999 रुपयांत खरेदीची संधी...पाहा फीचर्स अन् ऑफर्स!

Katraj Kondhwa Road Issue : आयुक्तांचे आश्वासन विरणार हवेत! कात्रज कोंढवा रस्ता; उर्वरित १० मिळकतींमुळे रस्ता रुंदीकरण रखडणार

Farmer Agitation : शेतकरी संकटात, सरकार कुठंय? लोहाऱ्यात हजारो शेतकऱ्यांचा आक्रोश; आमदारांना बोलण्यास मनाई करत शेतकऱ्यांनी सोयाबीन उधळले

SCROLL FOR NEXT