Shaila Godse
Shaila Godse 
सोलापूर

चक्क उमेदवारानेच केले लॉकडाउनच्या विरोधात पंढरपुरात आंदोलन !

भारत नागणे

पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर तालुक्‍यासह सोलापूर जिल्ह्यातील लॉकडाउन रद्द करावा, या मागणीसाठी आज चक्क पोटनिवडणुकीत उभ्या असलेल्या उमेदवार शैला गोडसे यांनी तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले. 

कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याच्या धास्तीने राज्य सरकारने मिनी लॉकडाउन जाहीर केला आहे. पंढरपुरातील विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिरासह राज्यातील सर्वच देवस्थाने बंद केली आहेत. पंढरपूरची अर्थव्यवस्था ही वारीवर अवलंबून आहे. कोरोनामुळे गेल्या वर्षभरात पंढरपूरच्या चार प्रमुख यात्रा रद्द झाल्या आहेत. त्यामुळे येथील छोट्या - मोठ्या व्यावसायिकांवर आर्थिक अडचणी आल्या आहेत. असे असतानाच राज्यात पुन्हा लॉकडाउनचे संकट घोंगावू लागले आहे. 

सध्या पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये शहरातील लॉकडाउनचा मुद्दा येथील प्रचाराचा प्रमुख मुद्दा बनला आहे. दोन दिवसांपूर्वी व्यापाऱ्यांनी आम्हाला दुकाने उघडण्यास परवानगी द्या, या मागणीसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते. त्याच मागणीनुसार पंढरपूर - मंगळवेढा विधानसभेचे अपक्ष उमेदवार शैला गोडसे यांनी आज तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. पोटनिवडणुकीसाठी मोठ्या राजकीय पक्षांच्या सभांना प्रचंड गर्दी होत आहे. या वेळी कोरोना नियमांचे उल्लंघन होताना दिसत असताना फक्त व्यापाऱ्यांवर निर्बंध लादले जात असल्याचा आरोप करत सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dombivli MIDC Blast : डोंबिवली एमआयडीसी कंपनीत भीषण स्फोटात आत्तापर्यंत 8 जणांचा मृत्यू, 64 जखमी, संख्या वाढण्याची भीती

Lok Sabha Election 2024 : सहाव्या टप्प्यातीलप्रचार थंडावला! देशातील ५७ मतदारसंघांत शनिवारी मतदान

Pune Porsche Accident : अपघातानंतर पळून जाण्याचे कारण काय? विशाल अग्रवाल यांची पोलिसांकडून कसून चौकशी

Dombivli MIDC Blast : डोंबिवली MIDC दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत; CM एकनाथ शिंदेंची घोषणा

Pune Porsche Accident: '...तर तुला मारून टाकेन'; कल्याणीनगर अपघातातील आरोपीच्या आजोबाचं आणखी एक अंडरवर्ल्ड कनेक्शन आलं पुढे

SCROLL FOR NEXT