Pangaon GP 
सोलापूर

पानगाव ग्रामपंचायत निवडणूक रद्द ! आरक्षण सदोष असल्याचा ठपका 

संतोष कानगुडे

पानगाव (सोलापूर) : बार्शी तालुक्‍यातील पानगाव ग्रामपंचायत निवडणूक विषयक सर्व टप्पे रद्द करण्यात यावेत व या ग्रामपंचायतीचा चालू निवडणूक कार्यक्रमामध्ये समावेश करू नये, अशा आशयाचे पत्र बार्शी तहसीलला जिल्हाधिकारी सोलापूर कार्यालयाकडून प्राप्त झाले आहे. ग्रामपंचायतीचे आरक्षण योग्य रीतीने व नियमानुसार झाले नसून, ते सदोष असल्याचा ठपका पत्रात ठेवण्यात आला आहे. 

याबबत अधिक माहिती अशी, की नोव्हेंबर महिन्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रभाग रचना व प्रभानिहाय आरक्षण हा कार्यक्रम राबविण्यात आला होता. यामध्ये प्रामुख्याने प्रभाग क्रमांक पाचमध्ये सर्वसाधारण मतदारांची संख्या तुलनेने जास्त असून देखील तो प्रभाग या निवडणुकीसाठी संपूर्ण आरक्षित झाला होता. यावर त्याच प्रभागातून गेल्या वेळी निवडून गेलेले माजी उपसरपंच बालाजी ताटे यांनी हरकत घेत या प्रभागात सर्वसाधारण जागेला न्याय मिळावा म्हणून राज्य निवडणूक आयोग यांच्याकडे कागदपत्रांसह धाव घेतली होती. 

या पार्श्‍वभूमीवर निर्णय होऊन 22 डिसेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाने वरील विषयाचे आदेश काढले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर यांचे बार्शी तहसीलला पत्र मिळाले आहे. पत्रात पानगाव ग्रामपंचायतीचे निवडणूक विषयक सर्व टप्पे रद्द करण्यात यावेत, असे म्हटले असून यासाठी नव्याने प्रभाग रचना करण्याकरिता स्वतंत्रपणे कार्यक्रम देण्यात येईल, असेही नमूद केले आहे. 

प्रभाग रचना व प्रभागनिहाय आरक्षण झाल्यानंतर त्यामध्ये असणाऱ्या त्रुटी आम्ही निवडणूक प्रक्रियेतील सर्व प्रशासकीय अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून देऊन रिव्हिजन दाखल केले होते. परंतु ते आम्हाला न्याय देऊ शकले नाहीत म्हणून आम्हाला शेवटी राज्य निवडणूक आयुक्ताचे कार्यालय गाठावे लागले. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशाबद्दल आम्ही समाधानी आहोत. परंतु प्रत्येक तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयात अर्जदाराचे म्हणणे काळजीपूर्वक ऐकून घेतले जावे, ही अपेक्षा आहे. पण कोण ऐकत नाही ही खंत आहे. नागरिकांना राज्य निवडणूक आयोग अथवा उच्च न्यायालयापर्यंत जाण्याची वेळ येऊ देऊ नये याची दक्षता जिल्हा प्रशासनाने घ्यावी. 
- ऍड. विकास जाधव, हरकतदाराचे वकील 

प्रभागनिहाय आरक्षण जाहीर झाल्यानंतर ते चुकीचे आहे असे माझे मत तयार झाले होते. मी वारंवार जिल्हा प्रशासनाला ते सांगण्याचा प्रयत्न केला होता; परंतु याची दखल घेत नाहीत, हे लक्षात आल्याने राज्य निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. यावर राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाने त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. 
- माजी उपसरपंच बालाजी ताटे, हरकतदार 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : चांदीच्या आयातीवर केंद्र सरकारचे निर्बंध; दरवाढीची शक्यता

SCROLL FOR NEXT