Electonic vehicle two charging station  esakal
सोलापूर

Solapur News : ई-व्हेईकलसाठी सोलापुरात दोन चार्जिंग स्टेशन

‘महावितरण’चा पुढाकार; शहर-जिल्ह्यात तीन हजार इलेक्ट्रिक वाहने

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : ई-व्हेईकलची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या सोलापूर शहरात दोन हजार १०२ तर ग्रामीणमध्ये ८०३ इलेक्ट्रिक व्हेईकल रस्त्यावर धावत आहेत. त्याची नोंदणी ‘आरटीओ’कडे झाली आहे.

पण, त्या वाहनांच्या शास्त्रोक्त चार्जिंगसाठी सोलापूर जिल्ह्यात व्यवस्थाच नाही. ही गरज ओळखून ‘महावितरण’ने सोलापूर शहरातील जुळे सोलापूर व अक्कलकोट रोड एमआयडीसी येथे चार्जिंग स्टेशन उभारले असून एप्रिलमध्ये त्याचा प्रारंभ होणार आहे.

हवा प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याची चिंता व्यक्त करीत केंद्र सरकारने नवीन धोरण आणले आहे. १५ वर्षांवरील शासकीय वाहने आता ३१ मार्चपूर्वी भंगारात काढली जाणार आहेत. तर खासगी वाहनांना २० वर्षांची मुदत असणार आहे, पण त्यासंबंधीचा अंतिम निर्णय अजून झालेला नाही.

तत्पूर्वी, इंधनासाठी परकीय देशावर अवलंबून राहावे लागते आणि वाहनांच्या अमर्याद संख्येमुळे इंधनाचा खपदेखील भरमसाट वाढला आहे. या पार्श्वभूमीवर, प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने ई-व्हेईकलला प्रोत्साहन दिले आहे.

त्यानुसार, ताशी २५ कि.मी.पेक्षा कमी वेग असलेल्या वाहनांची नोंदणी ‘आरटीओ’कडे करण्याची गरजच नाही. ताशी २५ कि.मी.पेक्षा अधिक वेग असलेल्या इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी मात्र बंधनकारक आहे. त्याअंतर्गत सोलापूर शहरात दोन हजार १०० दुचाकी, ७० तीनचाकी आणि ४६ चारचाकी आहेत.

तर ग्रामीणमध्ये ७८९ इलेक्ट्रिक दुचाकी आणि १४ चारचाकी आहेत. ‘महावितरण’ने उभारलेल्या चार्जिंग स्टेशनवर पहिल्यांदा चारचाकी वाहनांची सोय असणार आहे. आणखी दोन चार्जिंग स्टेशन सोलापूरसाठी मंजूर असून त्याठिकाणी दुचाकी व तीनचाकीची सोय केली जाणार आहे.

इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठी ‘महावितरण’तर्फे जुळे सोलापूर व एमआयडीसी येथील आमच्या सबस्टेशन परिसरातच दोन चार्जिंग स्टेशन उभारले जात आहेत. पुढील महिन्यात त्याचा शुभारंभ होईल. पहिल्या टप्प्यात चारचाकी वाहनांची सोय त्याठिकाणी केली असून एकावेळीच तीन गाड्यांचे चार्जिंग होईल, अशी व्यवस्था त्याठिकाणी असेल.

-संतोष सांगळे, अधीक्षक अभियंता, महावितरण, सोलापूर

चार्जिंग स्टेशनसंदर्भातील ठळक बाबी...

  • एकावेळी तीन वाहनांचे होऊ शकते चार्जिंग

  • अर्ध्या तासात वाहनाचे चार्जिंग पूर्ण होण्याची व्यवस्था

  • प्रतियुनिट साधारणतः: ११.१२ रुपयांचा खर्च; सर्व्हिस चार्ज तीन रुपये

  • युनिटप्रमाणे ऑनलाइनच पैसे भरावे लागणार; त्यानंतरच वाहन पुढे नेता येते

जिल्ह्यातील ई-व्हेईकलची स्थिती

  • दुचाकी - २,८८९

  • तीनचाकी - ७२

  • चारचाकी - ६०

  • एकूण - ३,०२१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asim Sarode: असीम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द; 'हे' वादग्रस्त विधान भोवलं

Priyanka Gandhi: हवाप्रदूषण कमी करण्यासाठी एकत्र काम करू; खासदार प्रियांका गांधी वद्रा यांचे केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारला आवाहन

Latest Marathi News Live Update : महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी फलटण पोलीस ठाण्याबाहेर सुषमा अंधारेंकडून ठिय्या

मित्रांसोबत दारू प्यायला जाताय? मग पुष्कर श्रोत्रीने सांगितलेले 'हे' चार नियम नक्की पाळा, म्हणतो- माझे वडील म्हणाले...

Supreme Court : 'महाकाल मंदिरासाठी आमची 200 वर्षे जुनी मशीद पाडली'; मुस्लिम पक्षाची सर्वोच्च न्यायालयात धाव, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT