solapur shugrarken 
सोलापूर

वीजेच्या तारा घासल्या अन्‌ 27 एकर उसाची झाली राख : 20 लाखांचे नुकसान 

सकाळवृत्तसेवा

 पंढरपूर ः उसाच्या शेतातून गेलेल्या वीज वाहक तारांचे घर्षण झाल्याने कौठाळी (ता. पंढरपूर) येथे तोडणीस आलेला 27 एकर ऊस जळून खाक झाला आहे. यामध्ये येथील नऊ शेतकऱ्यांचे जवळपास 15 ते 20 लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. 
या घटनेस महावितरणच जबाबदार असल्याचा आरोप करत नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा जनहित शेतकरी संघटनेचे सचिन अटकळे यांनी दिला आहे. 

येथील काही शेतकऱ्यांच्या शेतातून वीज वितरण कंपनीच्या वीज वाहक तारा गेल्या आहेत. परंतु या वीज वाहतूक तारा जुन्या आणि कुचकामी झाल्या आहेत. शिवाय त्या खाली लोंबत असल्याने घर्षण होऊन आग लागण्याचे प्रकार घडले आहेत. अनेकवेळा तक्रारी करुनही वीज वितरण कंपनीने याकडे लक्ष दिले नाही. अखेर वीज वाहक तारांचे घर्षण होऊन आज ऊसाच्या फडाला आग लागली. येथील शेतकरी सुरेश वांगडे, रामचंद्र बेंदे, कोंडीबा वांगडे, भारत गोडसे, राजाराम गोडसे, सुनिता गोडसे, गोरख कारंडे, शिवाजी कारंडे या शेतकऱ्यांचा तोडणीस आलेला 27 एकर ऊस जळून खाक झाला आहे. आधीच महापूर आणि अतिवृष्टीमुळे नदीकाठचे शेतकरी संकटात असतानाच पुन्हा वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा फटका येथील शेतकऱ्यांना बसला आहे. 

संपादन : अरविंद मोटे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT