Gambler 
सोलापूर

अबब..! हैद्रा येथील जुगार अड्ड्यावरील छाप्यात 11.38 लाखांचा मुद्देमाल जप्त 

चेतन जाधव

अक्कलकोट (सोलापूर) : हैद्रा (ता. अक्कलकोट) येथील शेतामध्ये खुल्या जागेत रिंगण करून मन्ना नावाचा जुगार खेळताना पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात दोन मोटारसायकली, एक कार व रोख रक्कम 78 हजार 40 असा एकूण 11 लाख 38 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संशयित 16 आरोपींना अटक करण्यात आली आहे. दक्षिण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

घटनेची फिर्याद सोलापूर ग्रामीणच्या विशेष पथकातील पोलिस शिपाई मनोज सुरेश राठोड (वय 25) यांनी अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाण्यात दिली आहे. या धाडीमध्ये संशयित आरोपी सैपन खतालशा मकानदार (वय 40, रा. हैद्रा), नागराज पिरप्पा टेंगळे (वय 32 रा. माशाळ, कर्नाटक) आदींसह 16 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. सोलापूर ग्रामीणच्या विशेष पथकास मिळालेल्या माहितीवरून व अक्कलकोट दक्षिण पोलिसांच्या सहकार्याने जुगार अड्ड्यावर टाकण्यात आला. 

विशेष पथक व पोलिसांनी हैद्रा येथील गुरप्पा हाचदड यांच्या शेतातील खुल्या जागेमध्ये 16 संशयित आरोपी गोल रिंगण करून मन्ना नावाचा जुगार शुक्रवारी रात्री 11.30 वाजता खेळत होते. या वेळेस पोलिसांनी टाकलेल्या धाडीत मोटारसायकल क्रमांक एमएच 13 सीई 2045, एमएच 13 के एएम 9913, एमएच 42 व्ही 601 या तीन मोटारसायकली, एक एमएच 02 बीएम 5010 ही कार, जुगार साहित्य व रोख रक्कम रुपये 78 हजार 40 असा एकूण 11 लाख 38 हजार 40 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सोलापूर ग्रामीणच्या विशेष पथकात पोलिस निरीक्षक विनय बहीर, मनोज राठोड आदींचा समावेश होता. अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाण्यात संशयित 16 आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार लाला पवार करत आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara fraud Case: तमिळनाडूच्या महिलेची साताऱ्यात फसवणूक; १२ लाख अन् सात ताेळे साेने, परस्‍पर विक्री, विश्वास नडला, नेमकं काय घडलं!

Paithan News: जायकवाडी धरणाचा वीजपुरवठा अखेर पूर्ववत ; नाथसागर धरण अंधारात

US Iran Conflict : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; इराणवरील हल्ले १० दिवसांसाठी थांबवले, मध्यपूर्वेतील तणाव होणार कमी?

मोठी बातमी! जमिनीच्या प्रत्येक पोटहिश्श्याची मोजणी आता 200 रुपयांत होणार; महसूल विभागाचा निर्णय, 7/12 उताऱ्यावरील सर्वांच्या संमतीची अट, वाचा...

आजचे राशिभविष्य - 27 मार्च 2026

SCROLL FOR NEXT