Corona Media Gallery
सोलापूर

संपूर्ण सोलापूर जिल्हा कोरोनामुक्त! २.१७ लाख रुग्णांची कोरोनावर मात

मार्च २०२०पासून प्रत्येकाची धडकी भरवणारा कोरोना आता जिल्ह्यातून हद्दपार झाला आहे. मंगळवारी (ता. १३) शहर व ग्रामीणमध्ये कोरोनाचा एकही सक्रिय रुग्ण नाही. आतापर्यंत संपूर्ण जिल्ह्यातील दोन लाख १६ हजार ६९९ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली.

तात्या लांडगे

सोलापूर : मार्च २०२०पासून प्रत्येकाची धडकी भरवणारा कोरोना आता जिल्ह्यातून हद्दपार झाला आहे. मंगळवारी (ता. १३) शहर व ग्रामीणमध्ये कोरोनाचा एकही सक्रिय रुग्ण नाही. आतापर्यंत संपूर्ण जिल्ह्यातील दोन लाख १६ हजार ६९९ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली. प्रतिबंधित लसीकरणामुळे हा सकारात्मक परिणाम दिसत आहे.

जिल्ह्यातील ३० लाखांहून अधिक व्यक्तींनी कोरोनावरील प्रतिबंधित लसीचे (कोविशिल्ड, कोर्बोवॅक्स व कोवॅक्सिन) किमान दोन डोस टोचून घेतले. सामुहिक रोगप्रतिकारक शक्ती तयार झाल्याने कोरोनाचा मृत्यूदर झपाट्याने कमी झाला. मागील पाच महिन्यांत कोरोनामुळे एकाही रुग्णाचा जिल्ह्यात मृत्यू झालेला नाही. जिल्ह्यातील जवळपास बाराशे मुलांच्या घरातील कर्ता तर ४७ मुलांना पोरके करणारा कोरोना आता जिल्ह्यातून हद्दपार झाला आहे. पहिल्या व दुसऱ्या लाटेत अनेकांना ‘जगू की मरू’ अशी चिंता सतावत होती. निर्बंध असतानाही अनेक आई-वडिलांच्या आधाराची काठी, हसत्याखेळ्यात कुटुंबातील आई किंवा वडील, भाऊ, बहिण, आजी, आजोबा कोरोनाने हिरावून नेला. तोच कोरोना आता शांत झाला असून जिल्ह्यातून हा विषाणू हद्दपार झाल्याची स्थिती आहे. पंढरपूर, माळशिरस, बार्शी, माढा, मोहोळ व उत्तर सोलापूर या तालुक्यांसह सोलापूर शहरात कोरोनाच्या पहिल्या दोन्ही लाटांवेळी भयावह परिस्थिती होती. प्रत्येकांनी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’चा अवलंब केल्याने कोरोना हद्दपार झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.

मरणाविरूद्ध लढले अन्‌ जिंकलेही

कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर उपचारासाठी रुग्णालयात बेड मिळाले नाही. बेड मिळाले तर ऑक्सिजन नाही, अशी भीषण अवस्था कोरोनाच्या पहिल्या दोन लाटांवेळी पहायला मिळाली. अशा परिस्थितीत देखील जिल्ह्यातील तब्बल दोन लाख १६ हजार ६९९ रुग्ण कोरोनायोद्धा ठरले. मरणाविरूद्धची लढाई त्यांनी यशस्वीपणे जिंकली. तरीपण, मृत्यूशी संघर्ष करणाऱ्या पाच हजार २४५ रुग्णांचा जीव कोरोनाने घेतलाच.

जिल्ह्यातील कोरोनाची सद्यःस्थिती

  • एकूण बाधित

  • २,२१,९४४

  • उपचारातून बरे

  • २,१६,६९९

  • कोरोनाचे बळी

  • ५,२४५

  • सध्याचे सक्रिय रुग्ण

  • ०००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai BMC Job Scam : मुंबई महापालिकेत नोकरीचे आमिष; मुंबई, सांगली, सातारा, कोल्हापूरमधील 43 जणांची 33 लाखांची फसवणूक

लढाऊ विमान तेजसचा ब्रेक फेल, धावपट्टीवरून गेलं पुढे; हवाई दलाने घेतला मोठा निर्णय

IND vs SA : वॉशिंग्टन सुंदर अन् डेव्हिड मिलर यांच्यात हाय-व्होल्टेज राडा! अम्पायर, इशान किशन भांडण सोडवायला धावले... Video Viral

Pune News: व्यभिचार सिद्ध करणे ठरतेय आव्हानात्मक; न्यायालयात परिस्थितीजन्य दस्तऐवज, पुराव्यांची साखळी आवश्यक!

Latest Marathi News Live Update : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना नांदेड भूषण पुरस्कार प्रदान

SCROLL FOR NEXT