Entry of Corona virus in Madha taluka of Solapur district 
सोलापूर

माढा तालुक्यात कोरोनाने मृत्यू; 40 जणांचे स्वॅब घेतले जाणार 

सकाळ वृत्तसेवा

कुर्डू (सोलापूर) : लऊळ (ता. माढा) येथील एका महिलेचा उपचारादरम्यान सोलापूर येथे मृत्यू झाला असून या कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या लऊळ, टेंभुर्णी येथील 40 जणांचे स्वॅब घेण्यात येणार आहेत. 
माढा तालुक्‍यात कोरोनाची एन्ट्री या अगोदर वरवडे येथील बाहेरून आलेल्या एका रुग्णामुळे आल्याची चर्चा होती. पण त्याचाही रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने वातावरण शांत झाले होते. आज सकाळी लऊळ येथील महिलेचा सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा, कोरोना समिती कामाला लागली असुन या वस्तीवरील एक किलोमीटर परिसर सील करण्यात आला आहे. या परिसरातील सर्व्हेसाठी रवाना झाली आहे. 
सोलापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक
हे कुटुंब टेंभुर्णी येथील एका हॉटेलमध्ये काम करत होते. नऊ ते दहा महिन्यांपूर्वी लऊळ येथे त्यांच्या मूळ गावी वास्तव्याला आले आहे. हे कुटुंब गावापासून पाच किलोमीटरवर वस्तीवर वास्तव्याला असून या कुटुंबाचा गावात जास्त संपर्क नसल्याची माहिती समोर आली आहे. या महिलेला कोरोनाची लक्षणे असल्याच्या संशयावरून लऊळ प्राथमिक आरोग्य केंद्राने 3 जूनला मोडनिंब येथील रुग्णालयात पाठविले होते. परंतु त्या महिलेचे माहेर टेंभुर्णी असल्याने व इतर आजाराचे उपचार ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू होते. तेथे तपासणी केली असता तेथील डॉक्‍टरांनी सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला. त्यांनी टेंभुर्णी येथील एका खासगी दवाखान्यात पाठवले. त्यानुसार उपचारासाठी अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. येथून सोलापूरला 108 या रुग्णवाहिकेने दाखल करण्यात आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पी. व्ही. पलंगे यांनी सांगितली. सोलापूर येथे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्या महिलेचा स्वॅब घेण्यात आला होता. तिच्यावर उपचार सुरू असताना गुरुवारी सकाळी 11.30 वाजताच्या दरम्यान मृत्यू झाला. दाखल करून घेण्यात आलेला स्वॅब पॉझिटिव्ह निघाल्याने लऊळ गावात खळबळ उडाली आहे. आरोग्य खाते, कोरोना समितीही सतर्क झाली असून या कुटुंबाच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेत आहे. 
टेंभुर्णी येथून अकलूजच्या प्रवासासाठी नातेपुते येथील अनोळखी अलिशान गाडीतून प्रवास केला असल्याचे त्यांच्या नातेवाइकांनी सांगितले. तो अनोळखी नातेपुते येथील कोण याची चर्चा सुरू होती. या अहवालाची माहिती मिळताच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पी. व्ही. पलंगे व त्यांचे पथक, पोलिस पाटील चंद्रकांत पाटील, ग्रामपंचायत सदस्य दिनेश कांबळे, तलाठी राजाभाऊ आदलिंगे, कृषी सहायक शैलेश घुगे, बीट हवालदार माळी, स्वयंसेवक स्वप्नील जानराव, निलेश जानराव, अंगणवाडी सेविका, आशा कर्मचारी यांनी त्या परिसरात कोणीही घराबाहेर पडू नका व इतर सूचना दिल्या. 

ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय मोरे म्हणाले, वस्ती गावापासून पाच किलोमीटर अंतरावर आहे. या कुटुंबांच्या संपर्कात गावातील एक डॉक्‍टर व कंपाउंडरसह टेंभुर्णी येथील नातेवाईक व अन्य, लऊळ येथील कोण कोण आहेत याची माहिती घेत असून सध्या 40 जणांचे स्वॅब घेण्यासाठी यादी तयार केली आहे. 
सरपंच प्रियंका कांबळे म्हणाल्या, गावामध्ये 1 जून ते 5 जून आम्ही जनता कर्फ्यू केला होता. तो आज संपत होता. पण या कोरोना पॉझिटिव्हमुळे आणखी 14 दिवस वाढ होत असून नागरिकांना याचे पालन करावे. या अगोदर गावात निर्जंतुकीकरणाची फवारणी केली असून आणखी फवारणी करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंजाब किंग्सच्या 'डिल' वर आर अश्विन खूपच प्रभावित; म्हणतोय, हा खेळाडू IPL 2026 मध्ये घुमशान घालणार

Education News: उच्च शिक्षणात क्रांती! परदेशी शिक्षणाचा खर्च वाचणार; भारतातच जागतिक विद्यापीठांचे वर्ग भरणार

Latest Marathi News Live Update : नाशिक–संभाजीनगर महामार्गावर उसाचा ट्रॅक्टर पलटी; दीड तास वाहतूक ठप्प

Kolhapur Election : एफआरपी थकवणाऱ्यांवर कारवाई करा! राजू शेट्टींचा सरकारवर थेट हल्लाबोल

Cold wave alert: कडाक्याची थंडी वाढली, आरोग्याची घ्या काळजी! आरोग्य विभागाचे आवाहन

SCROLL FOR NEXT