In the epidemic of Corona the son came to the aid of the village 
सोलापूर

कोरोनाच्या महामारीत सुपुत्र आला गावच्या मदतीला 

अक्षय गुंड

उपळाई बुद्रूक (ता. माढा, जि. सोलापुर) : सध्या सगळीकडे कोरोनाचे संकट आहे. प्रशासन, नागरिक खबरदारीसाठी सर्वपरिने प्रयत्न करत आहेत. त्यात पुणे जिल्ह्यात प्रादुर्भाव वाढत चालला असल्याने दिवे गावचे सुपूत्र तथा सोलापूर ग्रामीणचे अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांनी आपण ज्या भूमीत जन्म घेतला, त्या कर्मभूमीचे काहीतरी देणे लागतो, या सामजिक भावनेतून करोना या आजाराशी सामना करण्यासाठी तसेच प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी पुरंदर येथे सोलापूरहून 9 ते 10 हजार लोकांना वाटप करता येथील एवढी भारत सरकारच्या आयुष्य मंत्रालयाच्या वतीने शिफारस करण्यात आलेल्या होमिओपॅथीक अर्सेनिक अल्बमचे औषाधे पाठवली आहेत. नोकरीनिमित्त बाहेर असताना देखील कोरोनासारख्या या महामारीत ते गावच्या खबरदारीसाठी प्रयत्न करत असल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. 
याबाबत माहिती देताना अप्पर पोलिस अधिक्षक अतुल झेंडे म्हणाले की, भारत सरकारच्या आयुष्य मंत्रालयामार्फत होमियोपॅथी अर्सेनिक अल्बम 30 हे औषध कोवीड-19 संदर्भात पाठविण्यात आले आहे. एका बाटलीमध्ये 5 ते 6 व्यक्तींसाठी औषधे देण्यात आली आहेत. या औषधाच्या तीन गोळया दिवसातून दोन वेळा सकाळी व संध्याकाळी अशा प्रकारे सतत तीन दिवस घ्याव्यात. सदरच्या गोळ्या जेवणापुर्वी 15 ते 20 मिनिटे अगोदर किंवा जेवणानंतर 15 ते 20 मिनिटांनी सेवन कराव्यात. यात खंड पडू देऊ नये. तसेच हे औषधे घेतल्यास कच्चा कांदा, कच्चा लसूण, कॉफी इत्यादीचे सेवन करू नये. प्रौढ व्यक्तींनी वरील प्रमाणात औषध घ्यावे तर नवजात बालकांना याची आवश्‍यकता नाही. तसेच या औषधाबरोबर तुम्ही तुमची इतर नियमित औषधेही घेवू शकता. तसेच रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी उपाशी पोटी न रहाता वेळेवर भरपूर जेवन करावे. दिवसभरात शक्‍यतो गरम, कोमट पाणी प्यावे. कोमट मिठाच्या पाण्याच्या गुळण्या कराव्यात. गरम पाण्याची वाफ घ्यावी तसेच आठ तास झोप घ्यावी. या सर्व गोष्टींचे पालन केल्यास आपण नक्कीच करोनावर मात करू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident In Kagal : नॅशनल हायवे बनला मृत्यूचा सापळा, रेल्वे भरतीची परीक्षा देऊन घरी येताना विवाहितेचा भीषण अपघात; दोन्ही मुले झाली आईविना पोरकी

India Sports Economy: भारतीय क्रीडा अर्थव्यवस्था २०० कोटी डॉलर पार; २०२५ वर्षामध्ये १३.४% वाढ; क्रिकेटचा वाटा सर्वाधिक ८९ टक्क्यांचा

LPG Cylinder Booking Rules : एलपीजी बुकिंगच्या नियमात मोठा बदल, आता ३५ दिवसांनंतरच बुक करता येईल सिलिंडर

Chhatrapati Sambhajinagar: जुन्या शहरात पुन्हा धावणार स्मार्ट बस – पर्यटक व नागरिकांसाठी सुविधा वाढवणार

Yavatmal News : एमपीएससी पूर्वतयारी परीक्षेत यश न मिळाल्याने विद्यार्थ्यांने संपवले जीवन

SCROLL FOR NEXT