vijaypru Road Solapur 
सोलापूर

महिना झाला तरी "जड वाहतूक खोळबंलेलीच' : विजयपूर महामार्गावरील पूल बंद असल्याने जुळे सोलापूरकरांचे हाल 

अरविंद मोटे

सोलापूर : विजयपूर महार्गावरील धर्मवीर संभाजी तलावाजवळी रेल्वेमार्गावरल पूल वाहतुकीसाठी बंद ठेवून 6 नोव्हेंबर रोजी एक महिना पूर्ण झाला तरही अद्याप "काम चालू रस्ता बंदच' अशी अवस्था असल्याने यामार्गावरील जड वाहतूक खोळबंलेलीच आहे. या पुलावरील वाहतूक आसरापुलावरून वळवल्याने आसरा परिसरात वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. या वाहतूक कोंडीमुळे अपघाताच्या शक्‍यतेत वाढ झाली असून या परिसरातील नागरिक धुळीमुळे त्रस्त झाले आहेत. 

मलनिस्सारण निलिका टकाण्यासाठी 6 ऑक्‍टोबरपासून विजयपूर महामार्गावरील धर्मवीर संभाजी तलावाजवळील रेल्वेमार्गावरील पूल वाहतुकीसाठी बंद केला गेला. सुरवातील 21 ऑक्‍टोबरपर्यंत हा रस्ता बंद करण्यात आला होता. 20 ऑक्‍टोबरपर्यंत हे काम संपणे अपेक्षित असतानाच शहरात परतीचा मोठा पाऊस झाला. त्यामुळे काम बंद ठेवावे लागल्याने साधारणपणे 24 ऑक्‍टोबरपर्यंत हा पूल बंदच ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यानंतरही काम पूर्ण न झाल्याने 4 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्यानंर पुन्हा दहा दिवस हा पूल जड वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. यामुळे अद्याप या पुलावरून मोठ्या प्रमाणात होणारी जड वाहतूक होटगी रस्त्यावरून सुरू असून या परिसरातील लोकांना धुळीचा समाना करावा लागत आहे. 

सध्या दिवाळीसण तोंडावर आल्याने या परिसरातील डीमार्टसह इतर अस्थापणात खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी आहे. मागील एक महिन्यापासून या परिसरातील लोक धुळीने त्रस्त झाले आहेत. रात्रभर या रस्त्याने जड वाहनांची वाहतूक सुरू असल्याने आणि हा सर्व परिसर रहिवाशी परिसर असल्याने रात्री झोप येत नसल्याने या भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत. 


महिना झाला तरी "काम चालू रस्ता बंदच' 
एक महिना पूर्ण झाला तरही अद्याप "काम चालू रस्ता बंदच' अशी अवस्था असल्याने व जड वाहतूक आसरापुलावरून वळवल्याने जुळे सोलापूरकरांची दिवाळीही धुळीत जाणार असा प्रश्‍न या परिसरातील लोक विचारत आहेत. हे काम कधी पूर्ण होईल याकडे या परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. हा परिसर रहिवाशी परिसर आहे. ज्येष्ठ नागरिक, हॉस्पिटल तसेच अनेक व्यापारी अस्थापनांना या वाहनांचा व धुळीचा सामना करावा लागत आहे. 

चैतन्य नगर, जुळे सोलापूरमधील किराणा व्यापारी नितीन गोवर्धन म्हणाले एक महिन्यापासून धुळीने आम्ही हैराण झालो आहोत. सध्या दिवाळीचा सण असल्याने दुकानात मोठ्या प्रमाणात माल भरलेला आहे. धुळीमुळे माल खराब होत आहे. जड वाहतुकीमुळे हा येथील रस्ताही उखडला आहे. स्मार्ट सिटीसाठी विकास कामे आवश्‍यक आहेत. पण कामे वेळेत पूर्ण करणे आवश्‍यक आहे. धुळीमुळे हिवाळ्यात सर्दी खोकल्याचे प्रमाण वाढणार आहे. लवकर ही वाहतूक बंद करावी. 

जुळे सोलापूरमधील दुग्धालयचालक उमेश शिंदे जुळे सोलापुरातून ही वाहतूक वळवल्यापासून आम्हाला भयंकर त्रास सहन करावा लागला आहे. सकाळच्यावेळी लहान मुले सायकल चालवतात, ज्येष्ठ नागरिक फिरायला येतात त्यांना ही वाहतूक धोकादायक आहे. या वाहतुकीमुळे अपघाताची शक्‍यता वाढली असून रस्तेही खराब झाले आहेत. सकाळी लवकर येणारे ग्राहक व रात्री 9 नंतर येणारा ग्राहक या वाहतुकीमुळे पूर्ण थांबला आहे

वाहतूक पोलिस निरीक्षक संतोष काणे यांनी सांगितले की, 14 नोव्हेंबरपर्यंत या पुलावरील जड वाहतूक बंद ठेवण्यात आलेली आहे. 14 पर्यंत काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. काम पूर्ण झाल्यानंतर महापालिका अभियंता, महामार्ग अभियंता व वाहतूक विभाग यांच्याकडून पाहणी होईल. त्यांनतरच हा पूल वाहतुकीसाठी खूला होईल. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Name Symbol Row : 'तृणमूल'मधील दोन्ही गटांना निवडणूक आयोगाची नवी ओळख; ममता गटाला फुटबॉलपटू, तर बंडखोर गटाला मिळाले 'लिफाफा' चिन्ह

Girl Chasing Abhishek Sharma: अभिषेक शर्माच्या दिशेने पळाली तरुणी; रडली, ओरडायला लागली... हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं? Video

Chandrashekhar Bawankule : दुष्काळावर शरद पवारांनी राजकारण करू नये; बावनकुळेंचे प्रत्युत्तर, म्हणाले ‘सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी’

Sunil Prabhu Car Accident: मोठी बातमी! ठाकरे सेनेच्या आमदाराच्या कारने पादचाऱ्याला उडवलं, एक जण जखमी

iPhone 18 Sale in India: पत्नीला iPhone 18 Pro द्यायचा होता; दिल्लीच्या व्यक्तीने चक्क सोनंच विकलं!

SCROLL FOR NEXT