Textile 
सोलापूर

लॉकडाउन शिथिलीकरणानंतरही डगमगतोय "हा' उद्योग; "धडधड' निम्म्यावरच 

श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : लॉकडाउनमध्ये प्रशासनाकडे उद्योग सुरू करण्याचा तगादा लावलेला यंत्रमाग उद्योग एका महिन्यानंतरही डगमगतोय. 22 मार्चपासून बंद असलेला हा उद्योग लॉकडाउन शिथिलीकरणानंतर 4 जूनपासून सुरू झाला; मात्र कोरोनाच्या भीतीने अक्कलकोट एमआयडीसी परिसरात पूर्वीप्रमाणे कामगारांची रेलचेल दिसून येत नाही. केवळ 70 टक्के यंत्रमाग उद्योग सुरू असून काही कारखान्यांत चार तास तर काहींमध्ये आठ तास काम चालू असल्याने उत्पादन निम्म्यावर आले आहे. 

दीर्घकाळ बंद असलेल्या यंत्रमागांची धडधड पुन्हा सुरू झाली मात्र खूपच क्षीण. प्रशासनाने घालून दिलेल्या सकाळी सात ते सायंकाळी पाचपर्यंतच्या वेळात पूर्वीच्या ऑर्डर पूर्ण करण्याचे लक्ष्य यंत्रमाग उत्पादकांनी ठेवले होते. मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कामगारांची संख्याही मर्यादित ठेवण्याचे नियोजन उत्पादकांना करावे लागत आहे. त्यामुळे कामगारांना एक दिवसाआड कामावर बोलवावे लागत आहे. त्यामुळे उत्पादनावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. जुन्या ऑर्डर्स पूर्ण करताना उत्पादकांना नाकीनऊ येत आहे. त्यात नवीन ऑर्डर्सची नोंदणी नसल्यानेही उत्पादकांची पंचाईत झाली आहे. त्यामुळे जवळपास 30 टक्के उत्पादकांनी कारखाने बंद ठेवणे पसंत केले असून, ज्यांच्याकडे पूर्वीचे ऑर्डर्स आहेत त्यांनी काही तासांपुरते उत्पादन सुरू ठेवले आहे. परिणामी उद्योग सुरू होऊनही कामगार व मालकांना अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. 

दररोज साडेचार कोटींची उलाढाल आली दोन कोटींवर 
यंत्रमाग उद्योगात मुख्यत: टेरी टॉवेलची निर्मिती सध्या सुरू आहे. चादर, बेडशीट अशी उत्पादनेही घेतली जातात. मात्र देशभरातील मॉल्स बंद आहेत. नागरिकही अत्यावश्‍यक वस्तूंचीच खरेदी करण्याला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे यंत्रमाग उद्योगातील उत्पादनांना मागणी कमी झाली आहे. जोपर्यंत जनजीवन पूर्वपदावर येऊन व्यवहार सुरळीत होत नाहीत, तोपर्यंत यंत्रमाग उद्योगातील उत्पादनांना मागणी कमीच असणार आहे. उत्पादने कमी झाल्याने दररोज साडेचार कोटींची उलाढाल होणाऱ्या या उद्योगात सध्या दोन कोटींचीच उलाढाल होत असल्याची माहिती जिल्हा यंत्रमागधारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम यांनी "सकाळ'शी बोलताना दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT