Rahul Shinde 
सोलापूर

बारा वर्षांनंतरही सुलतानपूरचे नामांतर राहुलनगर झाले नाही ! शहीद जवान राहुल शिंदे यांच्या कुटुंबीयांची खंत 

किरण चव्हाण

माढा (सोलापूर) : मुंबईवरील "26/11' दशहतवादी हल्ल्यात सुलतानपूर (ता. माढा) येथील जवान राहुल शिंदे शहीद झाले होते. त्यांच्या स्मृती कायम स्मरणात राहाव्यात म्हणून सुलतानपूर गावाचे नाव राहुलनगर करण्याची गृह मंत्रालयाने दिली होती. मात्र आज बारा वर्षांनंतरही सुलतानपूरचे राहुलनगर असे नामांतर झाले नसल्याची खंत राहुल शिंदे यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली. 

"26/11' ला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सुलतानपूर (ता. माढा) येथील शहीद जवान राहुल शिंदे यांच्या स्मृतिदिनानिमित्त सुलतानपूर येथील शहीद जवान राहुल शिंदे बहुउद्देशीय संस्था व ग्रामस्थांच्या वतीने गुरुवारी (ता. 26) रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. बारा वर्षांच्या प्रतीक्षेनंतरही सुलतानपूरचे नामांतर राहुलनगर असे झाले नसल्यामुळे या वेळी शहीद राहुल शिंदे यांच्या कुटुंबीयांनी खंत व्यक्त केली. 

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार इतर कोणतेही सांस्कृतिक उपक्रम न राबवता साधेपणाने शहीद जवान राहुल शिंदे यांच्या सुलतानपूर येथील अर्धाकृती पुतळ्यास गुरुवारी (ता. 26) सकाळी नऊ वाजता अभिवादन करण्यात येणार आहे. त्यानंतर रक्तदान शिबिर होणार आहे. 

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला बारा वर्षे पूर्ण होऊनही सुलतानपूर गावाचे सुपुत्र शहीद जवान राहुल सुभाष शिंदे यांच्या सुलतानपूर गावाचे मूळ नाव बदलून "राहुलनगर' असे झाले नाही. भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने 3 जुलै 2020 रोजी दिलेल्या अनुमतीनुसार महाराष्ट्र शासनाने 18 सप्टेंबर 2020 रोजी राजपत्र प्रसिद्ध केले आहे. पण इतर बाबींची पूर्तता करण्यास विलंब होत असल्याची खंत वीरपीता सुभाष शिंदे व बंधू प्रवीण शिंदे यांनी व्यक्त केली. 

26/11 च्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना गुरुवारी (ता. 26) राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. यामध्ये शहीद जवान राहुल शिंदे यांचे वीरपीता सुभाष शिंदे यांना मुंबई येथील राजभवनात दुपारी चार वाजता गौरवपत्र व भेटवस्तू देऊन राज्यपालांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उन्हाचा चटका अन् वादळी पावसाचाही तडाखा बसणार, कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भाला हवामान विभागाचा इशारा

शरण आलेल्या माओवाद्यांची नसबंदी रिओपनिंग शस्त्रक्रिया, कौटुंबिक आयुष्य सुखकर होणार

युद्ध थांबणं कठीण! इराणच्या अटी ठरू शकतात अडथळा, होर्मुझ टोल ते लष्करी तळ; अमेरिकेसमोर काय अटी?

Surat Station Redevelopment: A Boost for Mumbai-Gujarat Connectivity : मुंबई-सुरत लोकल सेवा सुरू होणार? सुरत स्टेशनवर सुरू असलेल्या 'या' कामांमुळे चर्चेला उधाण.

NRAI Demands Immediate Restoration of Commercial LPG Supply : एमएनजीएल (MNGL) पाईपलाईन आता वेगाने धावणार? हॉटेल उद्योगासाठी मोठी बातमी.

SCROLL FOR NEXT