Vitthal-Rukmini 
सोलापूर

कोरोना काळातही 37 हजार भाविकांनी घेतले विठुरायाचे मुखदर्शन ! 35.50 लाखांची देणगी जमा 

भारत नागणे

पंढरपूर (सोलापूर) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथील श्री विठ्ठल - रुक्‍मिणीचे मंदिर दर्शनासाठी खुले करून एक महिना पूर्ण झाला आहे. महिनाभराच्या काळात राज्यासह देशभरातील सुमारे 37 हजार भाविकांनी आनलाइन पास काढून विठुरायाचे मुखदर्शन घेतले आहे. याच दरम्यान मंदिर समितीला 35 लाख 50 हजार रुपयांची देगणीही जमा झाली आहे. 

कोरोना संकटामुळे लाखो भाविक-भक्तांचे श्रद्धास्थान असलेले पंढरपूर येथील विठुरायाचे मंदिर तब्बल आठ महिने बंद होते. सरकारी आदेशानंतर दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यातील सर्वच धार्मिक स्थळांबरोबर विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिर खुले करण्यात आले. कोरोनाचे संकट पूर्ण टळले नसले तरी काही प्रमाणात संसर्ग कमी झाल्याने पंढरपुरात भाविकांची वर्दळ वाढू लागली आहे. तरीही मंदिर समितीने कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करत फक्त देवाचे मुखदर्शन सुरू केले आहे. गेल्या आठ महिन्यांपासून देवाच्या दर्शनासाठी आसूलेले भाविकही नियमांचे कोटेकोरपणे पालन करून पंढरीनाथाच्या चरणी लीन होत आहेत, अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. 

मंदिर दर्शनासाठी खुले करून एक महिना पूर्ण झाला. महिनाभराच्या काळात राज्यासह देशभरातील सुमारे 37 हजार भाविकांनी ऑनलाइन पास काढून विठ्ठल - रुक्‍मिणीचे मुखदर्शन घेतले आहे. या काळात कार्तिकी यात्रेचा सोहळाही प्रातिनिधिक स्वरूपात साजरा केला. एका महिन्याच्या काळात मंदिर समितीला सुमारे 35 लाख 50 हजार रुपयांची देणगीही जमा झाली आहे. 

मंदिर तब्बल आठ महिने बंद असल्याने समितीला मिळणाऱ्या देणगीवर देखील मोठा परिणाम झाला होता. याच काळात मंदिर समितीने अनेक सामाजिक उपक्रम राबवून लोकांना मदत देखील केली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. त्यामुळे पंढरपूरचे अर्थकारणही काही प्रमाणात पूर्ववत होऊ लागले आहे. 

कोरोनामुळे आठ महिने बंद असलेले विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिर दिवाळी पाडव्यापासून मुखदर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. एक महिन्याच्या काळात सुमारे 37 हजार भाविकांनी विठुरायाचे मुखदर्शन घेतले आहे. मंदिर समितीला 35 लाख 50 हजार रुपयांची देणगीही जमा झाली आहे. 
- बालाजी पुदलवाड, 
व्यवस्थापक, श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समिती, पंढरपूर 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; विसर्जन मिरवणुकीमुळे पीएमपी बसच्या मार्ग आणि स्थानकांत बदल, हे आहेत पर्यायी मार्ग

Bank News : ग्राहकांसाठी रविवारी बँका सुरू; २८ ते ३० सप्टेंबरच्या संपाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

Nanded Farmers: ‘काजू-बदाम खा, पण शेतकऱ्यांना न्याय द्या’; अर्धापुरात काँग्रेसचा जनाक्रोश, घंटानाद करून दुष्काळ जाहीर

मुंबईकरांचा प्रवास सुसाट! ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह भुयारी मार्गासह 'ठाणे-बोरिवली'साठी दुय्यम कर्ज; सरकारचा मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : पुण्यात विसर्जन सोहळ्यासाठी महापालिकेची तयारी

SCROLL FOR NEXT