Water_Supply 
सोलापूर

महापालिकेतील धक्कादायक प्रकार उघड ! शहरात दररोज 10 एमएलडी पाण्याची चोरी 

तात्या लांडगे

सोलापूर : उजनी धरण, औज तथा टाकळी बंधारा आणि हिप्परगा तलावातून सोलापूर शहरासाठी दररोज 140 एमएलडी पाणी उपसा केला जातो. पाणी साठविण्याची यंत्रणा पुरेशी नसल्याने नागरिकांना तीन दिवसांचे पाणी एकाच दिवशी दिले जात आहे. मात्र, एकूण उपसा होणाऱ्या पाण्यातून 30 टक्‍के पाण्याची गळती तर 18 टक्‍के पाण्याची चोरी होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हद्दवाढ भागासह शहरातील काही नागरिकांना कमी दाबाने पाणी मिळत आहे. यावर आता महापालिका आयुक्‍त काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

महापालिकेच्या दरवर्षीच्या वार्षिक अंदाजपत्रकानुसार महापालिकेला विविध विभागांच्या माध्यमातून सुमारे सहाशे कोटींपर्यंत उत्पन्न अपेक्षित आहे. मात्र, अंदाजपत्रकातील उद्दिष्टात मागील चार वर्षांत तेराशे कोटींहून अधिक रुपयांची तूट आली आहे. शहराचा विस्तार वाढत असून कुटुंब संख्याही वाढली आहे. मात्र, त्या तुलनेत नळ कनेक्‍शन वाढलेच नाहीत. काही दिवसांपूर्वी महापालिका आयुक्‍तांनी चोरीचे नळ कनेक्‍शन शोध मोहीम सुरू केली आणि त्यात दोन हजारांपर्यंत बोगस नळ कनेक्‍शन आढळले. त्यानंतर मात्र पुढे काहीच झाले नाही. सध्या उजनी धरणातून शहरासाठी दररोज सुमारे 60 एमएलडी, टाकळीतून 70 ते 75 एमएलडी आणि हिप्परगातून नऊ एमएलडी पाणी उपसा केला जातो. गळती वगळता दररोज पाणीपट्टीतून महापालिकेला साडेचार लाख आणि वार्षिक पाच कोटींपर्यंत उत्पन्न मिळेल, असे उद्दिष्टे ठेवले जाते. मात्र, पाणी चोरी आणि गळतीमुळे त्यात मोठी घट झाली आहे. दुसरीकडे विस्कळीत पाणी पुरवठ्यामुळे बहुतांश नागरिक पाणीपट्टी भरत नसल्याचेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. या सर्व प्रश्‍नांवर आता महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर कसा तोडगा काढणार आणि सत्ताधारी भाजप निवडणुकीपूर्वी दिलेले आश्‍वासन कशा पद्धतीने पूर्ण करणार, याची उत्सुकता आहे. 

शहराची सद्य:स्थिती... 

  • अंदाजित लोकसंख्या : 12.75 लाख 
  • दररोज मिळणारे पाणी : 140 एमएलडी 
  • पाण्याची दररोजची गळती : 40 एमएलडी 
  • प्रत्यक्षात मिळणारे पाणी : 100 ते 105 एमएलडी 
  • दररोजची पाणी चोरी : 9 ते 10 एमएलडी 

शहरातील पाणीपुरवठा सुरळीत व्हावा म्हणून महापौर व महापालिका आयुक्‍तांच्या मार्गदर्शनाखाली ठोस नियोजन सुरू आहे. उजनी, टाकळी व हिप्परगा या तिन्ही स्रोतांतून मिळणाऱ्या एकूण पाण्यातून 30 टक्‍के पाण्याची गळती आहे. तर शहरात नऊ ते दहा एमएलडीपर्यंत पाण्याची चोरी होते, असे निर्दशनास आले आहे. 
- सिद्धेश्‍वर उस्तुरगे, 
अभियंता, सार्वजनिक आरोग्य व पाणीपुरवठा, महापालिका 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI : संजू सॅमसनची अविस्मरणीय खेळी... वंदे मातरम्... सूर्यकुमार यादवचा कुर्निसात... अंगावर शहारा आणणारा Video

T20 WC, IND vs WI : संजू सॅमसनची ९७ धावांची मॅच विनिंग खेळी! भारत ऐतिहासिक विजयासह उपांत्य फेरीत; आता इंग्लंडला भिडणार

Sanju Samson Reaction : देवाची कृपा! संजू सॅमसन भावनिक झाला; सेलिब्रेशन, देवाचे आभार अन् म्हणाला, विराट, रोहित यांनी...

BMC Property Tax: मुंबईकरांना दिलासा!मालमत्ता करात मोठा बदल; ७०० स्क्वेअर फूट घरांना फायदा, बीएमसीचा महत्त्वाचा निर्णय

Paithan Crime: अपहृत विद्यार्थिनीची सुटका, शिक्षकास बेड्या; पैठण पोलिसांची मुंबईत कारवाई, लोकेशन बदलून देत होता हुलकावणी!

SCROLL FOR NEXT