02Child_Mask_0.jpg 
सोलापूर

अक्‍कलकोट वगळता अख्खा जिल्हा रेड झोनमध्येच ! को- मॉर्बिडचा सर्व्हेच नाही; आज 162 पॉझिटिव्ह

तात्या लांडगे

सोलापूर : ग्रामीण भागातील रुग्णसंख्या आता 36 हजारांकडे वाटचाल करीत आहे. आज दोन हजार 28 संशयितांमध्ये 113 पुरुष आणि 49 महिलांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर आज माळशिरसमध्ये दोन, वांगी-1 (करमाळा) आणि भाळवणी (पंढरपूर) येथील प्रत्येकी एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, अक्‍कलकोट तालुक्‍यात आता 14 ऍक्‍टिव्ह रुग्ण असून उर्वरित तालुक्‍यांमधील उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 20 ते 538 पर्यंत आहे.

ठळक बाबी...

  • जिल्ह्यातील तीन लाख 30 हजार 540 संशयितांची कोरोना टेस्ट
  • आतापर्यंत ग्रामीणमध्ये आढळले 35 हजार 739 कोरोना पॉझिटिव्ह
  • ग्रामीण भागात आज चौघांचा मृत्यू; मृतांची संख्या आता एक हजार 45 झाली
  • आतापर्यंत 33 हजार 63 रुग्णांनी केली कोरोनावर मात; 1632 रुग्णांवर सुरु आहेत उपचार

ग्रामीणमध्ये आता एक हजार 632 रुग्ण उरले असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. रुग्णांच्या संपर्कातील 11 हजार 995 संशयित होम क्‍वारंटाईनमध्ये तर तीन हजार 79 संशयित इन्स्टिट्यूशनल क्‍वारंटाईनमध्ये आहेत. अद्याप 49 संशयितांचे अहवाल प्रलंबित असून दररोज सरासरी दोन हजार संशयितांची कोरोना चाचणी केली जात आहे. दरम्यान, अक्‍कलकोट तालुक्‍यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या आता 14 आहे. तर बार्शीत 89, करमाळा 112, माढा 223, माळशिरस 337, मंगळवेढा व मोहोळ तालुक्‍यात प्रत्येकी 83, उत्तर सोलापुरात 20, पंढरपूर तालुक्‍यात 538, सांगोल्यातील 111 आणि दक्षिण सोलापुरातील 22 ऍक्‍टिव्ह रुग्ण आहेत. जिल्ह्यातील रूग्णसंख्या आटोक्‍यात यावी म्हणून पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या मागणीनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी मास्क नसलेल्यांना 500 रुपयांचा दंड करण्याचा निर्णय घेतला. को- मॉर्बिड रुग्णांचा सर्व्हे घरोघरी सुरु असल्याचा दावा केला जात आहे. तरीही मृतांची व रुग्णांची संख्या ठरावीक तालुक्‍यात वाढत असतानाही जिल्हा परिषदेकडून ठोस उपाय केले जात नसल्याचे चित्र आहे. घरोघरी सर्व्हे करणारे दारातूनच निघून जात असल्याचेही दिसून येते. यावर मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचे दुर्लक्ष असल्याची चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Mental Hospital Controversy : सरकारी निवासस्थान की धार्मिक स्थळ? येरवडा मनोरुग्णालयातील 'त्या' बंगल्याचं धक्कादायक वास्तव समोर; आरोग्य विभागात मोठी खळबळ

Stock Market Today: शेअर बाजारात घसरण! IT सेक्टर दबावात; HCL Tech कोसळला, Tata-SBI चर्चेत; कारण काय?

Nagpur News: विमानात प्रवाशाचा हृदयविकाराने मृत्यू;स्पाइसजेटचे नागपुरात इमर्जन्सी लँडिंग

Latest Marathi News Live Update : नाशिक TCS प्रकरणात लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप

Nagpur News: क्षुल्लक कारणातून गुंडांचा ‘राडा’; सिगारेटच्या पैशांवरून उफाळला वाद ; घटना सोशल मीडियावर व्हायरल

SCROLL FOR NEXT