Fund 
सोलापूर

जमिनीच्या नोंदीमध्ये हेराफेरी ! पंढरपूर तालुक्‍यात अतिवृष्टी अनुदान घोटाळा आला समोर 

भारत नागणे

पंढरपूर (सोलापूर) : मागील दोन महिन्यांपूर्वी पंढरपूर तालुक्‍यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली होती. यामध्ये शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. पंचनामे करूनही शेतकऱ्यांना अद्याप एका दमडीचीही मदत मिळाली नाही. अशातच पंढरपूर तालुक्‍यातील कान्हापुरी गावामध्ये जमिनीच्या नोंदीमध्ये हेराफेरी करून शासनाचे बोगस अनुदान लाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये महसूल विभागातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून शासकीय सेवेत असणाऱ्या एका कोतवालाच्या बाबतीतला अनुदान घोटाळ्याचा प्रताप समोर आला आहे.

या कथित अनुदान घोटळ्याची चौकशी करून संबंधित कोतवालावर कारवाई करावी, अशी मागणी येथील शेतकरी रानबा शिंदे व नानासाहेब शिंदे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी केली आहे. 

पंढरपूर तालुक्‍यात 15 ऑक्‍टोबरदरम्यान अतिवृष्टी झाली होती. यामध्ये तालुक्‍यातील 69 हजार 500 शेतकऱ्यांच्या 65 हजार हेक्‍टर क्षेत्रावरील ऊस, केळी, द्राक्ष, डाळिंब, कांदा, मका, बाजरी, भुईमूग, भाजीपाला आदी पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे केले आहेत. दोन महिन्यांनंतर तालुक्‍यातील काही शेतकऱ्यांना अनुदान मिळाले असले तरी बहुतांश शेतकरी अद्यापही अनुदानापासून वंचित आहेत. दरम्यान, कान्हापुरी (ता. पंढरपूर) येथे अतिवृष्टी अनुदानात घोटाळा झाल्याची लेखी तक्रार येथील काही ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे केली आहे. अतिवृष्टीचे अनुदान मिळण्याआधीच तालुक्‍यातील पहिला अनुदान घोटाळा समोर आला आहे. या प्रकारामुळे महसूल विभागाचा अनागोंदी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. 

काय आहे अनुदान घोटाळा? 
कान्हापुरी येथील कोतवाल कुंडलिक विठ्ठल शिंदे यांचे एकत्रित कुटुंब आहे. वडील विठ्ठल कृष्णा शिंदे यांच्या सातबारा उताऱ्यावर एक एकर, पत्नी रेश्‍मा कुंडलिक शिंदे यांच्या नावे 24 गुंठे आणि मुलगा प्रणीत कुंडलिक शिंदे यांच्या नावे 39 गुंठे अशी जमीन आहे. दरम्यान, कोतवाल कुंडलिक शिंदे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून व महसूल विभागातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून हेराफेरी करून प्रत्येक खातेदाराच्या नावे पाच एकर क्षेत्र वाढवून त्यामधील कांदा, ऊस आणि मका या पिकांचे नुकसान झाल्याचे दाखवून अनुदान मंजूर करून घेतले आहे. 

अनुदानाची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर येथील शिंदे यांचा हा अनुदान घोटाळा समोर आला आहे. अशा प्रकारचे अनुदान घोटाळे तालुक्‍यातील अनेक गावांत झाले असल्याची शक्‍यता आहे. महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर व शेतकऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी कान्हापुरी येथील शेतकऱ्यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे. 

कान्हापुरी येथील कोतवाल कुंडलिक शिंदे यांनी जमीन नोंदीमध्ये हेराफेरी करून जास्तीचे अनुदान घेतल्याची लेखी तक्रार आली आहे. त्यानुसार मंडळ अधिकाऱ्यांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. चौकशीचा अहवाल प्राप्त होताच संबंधित कोतवालावर पुढील कारवाई केली जाईल. 
- सुरेश तिटकारे, 
नायब तहसीलदार, पंढरपूर 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT