सोलापूर

खुशखबर...! `या` तीन वर्षांतील निधी खर्चण्यास मिळाली मुदतवाढ

विजयकुमार सोनवणे

सोलापूर ः  नगरविकास विभागाकडून विविध विकासकामांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला निधी वेळेत खर्च करण्याचे बंधन असते. पण राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांनी निधी वेळेत खर्च केला नाही. परिणामी तब्बल तीन आर्थिक वर्षांतील निधी खर्च करण्यासाठी शासनाने मुदतवाढ दिली आहे. 

या तीन वर्षातील निधीला मुदतवाढ 
शासनाने 2015-16, 2016-17 आणि 2017-18 या आर्थिक वर्षातील विकासनिधी खर्च करण्यासाठी मुदतवाढ 31 मे 2020 पर्यंत दिली आहे.  हा निर्णय फक्त कार्यादेश देऊन सुुरु झालेल्या पण पूर्ण न झालेल्या कामांसाठीच असणार आहे. त्याचवेळी 2014-15 आणि त्यापूर्वीची सर्व अखर्चित निधी तातडीने शासनाकडे जमा करण्यासही सांगितले आहे. 

यांच्यावर आहे जबाबदारी
शासनाने दिलेल्या मुदतीमध्ये अखर्चित निधीचा विनियोग करण्याची जबाबदारी महापौर, नगराध्यक्ष, जिल्हाधिकारी, आयुक्त आणि मुख्याधिकार्यांवर टाकण्यात आली आहे. 

256 गाळ्यांच्या हस्तांतरणाचा मार्ग मोकळा
रविवार पेठेतील महापालिकेच्या 256 रहिवास गाळ्यांच्या हस्तांतरणाच्या मनपा सभेच्या ठरावाला आयुक्तांनी बुधवारी मंजुरी दिली. त्यामुळे हस्तांतरणाचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच या गाळ्यांच्या पुनर्विकासाचे पुढील सोपस्कर होणार आहे. सन 1970 सुमारास पूर्व भागातील अनेक झोपड्या जळीत झाल्याने या झोपडपटट्यांमधील लोकांचे संसार उघड्यावर आले होते.  महापालिकेने अशा लोकांसाठी रविवार पेठेत 256 रहिवास गाळे बांधून त्यांचे पुनर्वसन केले. या गाळ्यांना सुरुवातीचे काही वर्षे भाडे व नंतर कर आकारणीचे धोरण ठरले होते. मात्र यावरुन मनपा व गाळेधारकांमध्ये वाद आहे. गाळेधारक मासिक केवळ 28 रुपये भाडे नियमित भरत आहे, कराचा मुद्दा प्रलंबित होता.

मुदत संपलेल्या गाळेधारकांना अंतिम सुनावणीची नोटीस  
महापालिकेच्या पार्क स्टेडिअममधील मुदत संपलेल्या 42 गाळेधारकांना लवकरच अंतिम सुनावणीची नोटीस दिली जाणार आहे.  मुदत संपल्यापासून ते आजतागायतचे भाडे रेडीरेक्शरप्रमाणे भरुन 30 दिवसांत गाळे मनपाच्या ताब्यात देण्याबाबतचे हे आदेश राहणार आहेत. पार्क स्टेडिअममध्ये एकूण 59 गाळे असून यापैकी 42 गाळ्यांची मुदत सन 2016 मध्ये तर 9 गाळ्यांची मुदत 2017 मध्ये संपली होती. 42 गाळेधारकांना गाळे महापालिकेच्या ताब्यात देण्याविषयीच्या नोटिसा देण्यात आल्या होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

SCROLL FOR NEXT