सोलापूर

शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी समित्यांचा उतारा 

कुलभूषण विभूते

वैराग (जि. सोलापूर) : शेतकऱ्यांच्या उत्पन्नात सातत्य ठेवण्यासाठी व उत्पन्नात वाढ करण्यासाठी सरकारच्या विविध यंत्रणांमध्ये समन्वय साधला जाणार आहे. यासाठी तालुकास्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली 12 सदस्यीय समिती स्थापन करण्यात येणार आहे. 
तालुका कृषी अधिकारी हे या समितीचे सदस्य सचिव आहेत. याव्यतिरिक्त या समितीत गटविकास अधिकारी, पशुधन विकास अधिकारी, सिंचन विभागाचे उपअभियंता, कृषी विद्यापीठ संशोधन संस्थेचे प्रतिनिधी, पंचायत समितीचे कृषी अधिकारी, मत्स्य रेशीम ग्रामोद्योग या विभागाचे प्रतिनिधी, वीज विभागाचे अभियंता, बॅंकेचे प्रतिनिधी, सहायक निबंधक सहकारी संस्था यांचे प्रतिनिधी व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव यांना या समितीमध्ये स्थान देण्यात आले आहे. 

याशिवाय समितीच्या बैठकांना उपविभागीय कृषी अधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तीन महिन्यांतून एकदा या समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर चर्चा करून उपाययोजना सुचविल्या जाणार आहेत. तसेच या बैठकीत हवामान, पीक परिस्थिती, उत्पादकता, खत व बियाणे पुरवठा, पीककर्ज, कुटिरोद्योग, शेतकऱ्यांचे उत्पन्नवाढीसाठी जोडधंदे, बॅंकांची शेतकरी कर्ज प्रकरणे, वीजजोडणी प्रकरणे व सरकारच्या विविध योजना या विषयांवर या बैठकांमध्ये चर्चा केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill on IND vs SL Draw: "२५० षटकं अन् सलग तीन दिवस फिल्डिंग..." फॉलोऑननंतरही सामना ड्रॉ राहिल्याबद्दल गिल काय म्हणाला?

Marathi News Live Updates : टीएमसी कार्यालयात गोंधळ उडाला

Manora News : कृषी केंद्राचा परवाना रद्द न करण्यासाठी २५ हजारांची लाच; मंडळ कृषी अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

Hotel Business : हॉटेल व्यवसायाला ग्राहकांच्या अविश्वासाचा फटका! एफडीए कारवाईनंतर शहरातील रेस्टॉरंटमध्ये २० टक्क्यांपर्यंत घट

Pune News : स्थायी समितीतील निर्णय फिरवला! टक्केवारीच्या ‘दुर्गंधी’ने स्वच्छ सेवक साहित्याविना

SCROLL FOR NEXT