pandharpur city.jpg 
सोलापूर

यात्रा भरली नाही तर सहा महिन्यांची घरपट्टी व दुकानपट्टी रद्द कराः कोणी केली मागणी ते वाचा 

सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर(सोलापूर)ः या वर्षी आषाढी यात्रा पंढरपुरात कोरोना संकटाने होऊ शकली नाही. याचा फटका स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांना बसला आहे. नागरिक व व्यापारी अडचणीत आहेत हे लक्षात घेऊन पालिकेने घरपट्टी आणि व्यापाऱ्यांची दुकानपट्टी रद्द करावी, अशी मागणी भाजपने केली आहे. 

दरवर्षी पंढरपूर नगरपालिकेवर आषाढी यात्रेचा मोठा आर्थिक बोजा पडतो. यावर्षी आषाढी यात्रा न भरल्यामुळे हे अनुदान नगरपालिकेला मोफतच मिळाल्यासारखे आहे. 24 मार्च पासून ते 30 जून पर्यत पंढरपूर शहरातील व्यावसायिकांचा व्यापार ठप्प आहे. व्यापाऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. अशामध्ये दरवर्षी भरणारी आषाढी यात्रा यावर्षी न भरल्यामुळे छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांसह पंढरपुरातील सर्वानाच आर्थिक फटका बसलेला आहे. 

आषाढी यात्रा झाल्यानंतर नागरिक आपली नळपट्टी, घरपट्टी व दुकान पट्टी नगरपालिकेमध्ये प्रामाणिकपणे भरत असतात. यातून नगरपालिकेला सुमारे दहा कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त होते. या उत्पन्नातून पालिकेकडून आर्थिक विकासाची कामे होत असतात. चालू वर्षी आषाढी यात्रा न झाल्यामुळे तसेच मार्च महिन्यापासून कोरोनाचे संकट आल्यामुळे सर्व पंढरपूरकरांच्या समोर आर्थिक समस्या उभी ठाकली आहे. त्यामुळे पंढरपूर नगरपालिकेला मिळालेल्या पाच कोटी रुपये यात्रा अनुदानाचा उपयोग पालिकेने विकास कामासाठी करावा. व्यापाऱ्यांकडून मिळणारी कराची रकम 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर 2020 या सहा महिन्यांच्या कालावधीसाठी रद्द करावी. यासाठी पंढरपूर नगरपालिकेने विशेष सर्वसाधारण सभा बोलावून अशा प्रकारचा ठराव पारित करावा. शासनाकडून मिळालेले पाच कोटी रुपये अनुदान हे विकास कामांसाठी खर्च करण्याबाबत शासनाची अनुमती घ्यावी अशी मागणी भाजपने नगर पालिकेतील सत्ताधारी आघाडीचे नेते, आमदार प्रशांत परिचारक, नगराध्यक्ष साधना भोसले व मुख्याधिकारी अभिजीत मानोरकर यांच्याकडे केली आहे. 

नगरपालिकेने ठराव पारित करावा 
व्यापाऱ्यांकडून मिळणारी कराची रकम 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर 2020 या सहा महिन्यांच्या कालावधीसाठी रद्द करावी. यासाठी पंढरपूर नगरपालिकेने विशेष सर्वसाधारण सभा बोलावून अशा प्रकारचा ठराव पारित करावा. 
- संजय वाईकर, शहराध्यक्ष भाजपा पंढरपूर  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar Padma Bhushan : 'ज्ञानेश कुमार यांना पद्मविभूषण पुरस्कार द्या'; भाजप प्रदेशाध्यक्षांनी केली मागणी

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

Latest Marathi News Live Update : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे देशातील 12 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; IMD कडून अलर्ट जारी

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

SCROLL FOR NEXT