us todani yantra.jpg 
सोलापूर

'हा' कारखाना उसतोड यंत्र खरेदीसाठी शेतकऱ्यांना करणार थकहमीची मदत 

राजकुमार शहा


मोहोळ (सोलापूर) ः टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या सन 2020/21 च्या गळीत हंगामात ऊस तोडणी साठी जे शेतकरी ऊस तोडणी यंत्र खरेदी करतील त्यांना भीमा कारखाना थकहमीचे सहकार्य करणार असून, आतापर्यंत ऊस तोडणी यंत्र खरेदी करणाऱ्या दहा शेतकऱ्यांनी कारखान्याकडे तयारी दर्शविली असल्याची माहिती या कारखान्याचे उपाध्यक्ष सतीश जगताप यांनी दिली. 

चालू वर्षी कोरोना चा प्रादुर्भाव सर्वत्रच आहे. चालू वर्षी पाऊस काळ वेळेवर झाल्याने उसाच्या वजनात मोठी वाढ होणार आहे. प्रत्येक वर्षी साखर कारखाने कार्यक्षेत्रातील ऊस तोडणीसाठी बीड, जालना, औरंगाबाद, माजलगाव, जामखेड आदीसह अन्य भागातील ऊस तोडणी साठी मजुरांबरोबर करार करतात. वेळ प्रसंगी त्यांना आगाऊ आर्थिक ऊचल ही दिली जाते. मात्र चालू वर्षी करार केलेल्या पैकी कोरोनामुळे किती टोळ्या येतील या बाबत थोड़ी साशंकता आहे. गेल्या गळीत हंगामात अनेक साखर कारखान्यांनी यंत्राद्वारे ऊस तोडणी केली आहे. 

चालू वर्षी काही शेतकरी ऊस तोडणी यंत्र खरेदी करणार आहेत यंत्राची किंमत ही लाखोच्या घरात आहे, त्यामुळे जे शेतकरी यंत्र खरेदी करतील त्यांना कारखाना थकहमीसाठी लागणारे सहकार्य करणार आहे. त्यामुळे ऊस तोडणी सोयीस्कर होणार आहे. जिल्ह्यात भीमा कारखान्याने असा प्रयोग बहुदा प्रथमच राबविल्याचे उपाध्यक्ष जगताप यांनी सांगितले. 

जकराया खरेदी करणार दहा ऊस तोडणी यंत्र 
वटवटे (ता. मोहोळ) येथील जकराया साखर कारखाना ऊस तोडणी साठी दहा यंत्र खरेदी करणार असून, यंत्र उत्पादक कंपन्या बरोबर त्यांची किंमत, कार्यक्षमता व दर्जा या बाबत प्राथमिक स्वरूपात बोलणी सुरू असल्याचे या कारखान्याचे कार्यकारी संचालक सचिन जाधव यांनी सांगितले. ऊस तोडणी यंत्राचे अनेक नमुने आहेत, मात्र शेतकऱ्यांचा ऊस कमी वेळेत नुकसान न होता कसा तोडला जाईल अशा प्रकारची यंत्र खरेदी करणार असल्याचे ही जाधव यांनी सांगितले. 

संपादन ः प्रकाश सनपूरकर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT