Akkalkot Job Scam sakal
सोलापूर

Akkalkot Job Scam : तोतया उपजिल्हाधिकाऱ्यास अटक,नोकरीचे आमिष दाखवून लातूर येथील तिघांची ४० लाखांची फसवणूक

Akkalkot Job Scam : लातूरमध्ये उपजिल्हाधिकारी म्हणून खोटा परिचय देणाऱ्या पवन पांढरे याने नोकरीचे आमिष दाखरून ४० लाखांची फसवणूक केली. अक्कलकोट पोलिसांनी त्याला अटक करून चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

सकाळ वृत्तसेवा

अक्कलकोट : उपजिल्हाधिकारी असल्याचे खोटे सांगून एका तोतया अधिकाऱ्याने बनावट ओळखपत्र व शिक्के बाळगून लातूर जिल्ह्यातील फिर्यादी व त्याच्या दोन नातेवाइकांना नोकरीचे आमिष दाखविले.

निवासी जिल्हाधिकारी, सोलापूर यांचे बनावट नियुक्तिपत्र देऊन सुमारे ४० लाखांची फसवणूक केल्याची फिर्याद अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. फिर्यादी व आरोपी हे लातूर जिल्ह्यातील असून, आरोपी हा अक्कलकोटमध्ये एका नातेवाइकाकडे राहात होता.

संशयित आरोपीला आज (शुक्रवारी) अक्कलकोट न्यायालयात उभे केले असता त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. याची फिर्याद विठ्ठल गुंडेराव वाघमोडे (वय ६३, रा. संत ज्ञानेश्वरनगर, राजीव गांधी चौकाजवळ, लातूर) यांनी दिली. अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव पवन मारुती पांढरे (वय २०, रा. कासारशिरसी, ता. निलंगा, जि. लातूर) असे आहे.

हा फसवणुकीचा गुन्हा सप्टेंबर २०२३ ते ३ सप्टेंबर २०२४ यादरम्यान अक्कलकोट, सोलापूर व लातूर येथे घडला. संशयित आरोपी पवन पांढरे याने मागील दीड वर्षापासून सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी (भा.प्र.से.) या पदावर असल्याचे सर्वत्र सांगत होता.

तशा पदाचे व तशा स्वरूपाचे ओळखपत्र, कागदपत्रे तो स्वतःजवळ बाळगत होता. तसेच निवासी जिल्हाधिकारी यांच्या सहीची खोटी कागदपत्रे बनवून नोकरीचे आमिष दाखवून फिर्यादी विठ्ठल वाघमोडे व त्यांच्या दोन नातेवाइकांकडून ४० लाख रुपये घेऊन बनावट नियुक्तिपत्र देऊन फसवणूक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT