मंगळवेढा : तालुक्यातील जालीहाळ येथील जमीन सौर प्रकल्पासाठी अकर्षक करण्यासाठी महसूल खात्याकडे सादर केलेल्या प्रस्तावासोबत ग्रामपंचायतचा बनावट ना-हरकत दाखला सादर करणाऱ्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पंचायत समिती समोर धरणे आंदोलन सुरू केले आहे.
अमृत महोत्सवी स्वातंत्र्याच्या पूर्ण आंदोलन सुरू केल्यामुळे पंचायत समिती प्रशासनाचा निष्काळजीपणा समोर आला. यासंदर्भात गटविकास अधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले होते की,जालिहाळ ता.मंगळवेढा येथे प्रिसिजन कंपनीच्या वतीने सौर प्रकल्प तयार करण्यात येत असून त्यासाठीची जमीन अकर्षक करण्यासाठी ग्रामपंचायत यांच्याकडून 23 फेब्रुवारी 2022 चा ग्रामपंचायत ना हरकत दाखला तहसील कार्यालयाकडे सादर करण्यात आला.
याबाबत सदर ठरावाची चौकशी करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करत तहसील कार्यालयासमोर 1 मे 2023 रोजी उपोषण करण्यात आले होते. तहसीलदारांनी ग्रामपंचायतीकडून देण्यात आलेला ठराव ओरिजनल की बनावट याची चौकशी करण्याचे आदेश गटविकास अधिकारी यांना 4 मे 2023 रोजी देण्यात आले.
गटविकास अधिकारी यांनी विस्तार अधिकारी यांच्या मार्फत चौकशी करून 8 जून 2023 गटविकास अधिकारी यांना अहवाल सादर केला आला असून त्यामध्ये ग्रामपंचायत रोजी जावक क्र 88 नुसार 20 जानेवारी 2023 रोजी आलेला ठराव हा योग्य असून 23 फेब्रुवारी 2022 ला देण्यात आलेला दाखला हा बोगस असून तो आम्ही दिला नसल्याचा जवाब विस्तार अधिकारी यांच्या चौकशी समोर देण्यात आला.
त्यामुळे तहसील कार्यालयाकडे प्रिसिजन कंपनीने सादर केलेल्या प्रस्तावांमध्ये ग्रामपंचायतचा जोडण्यात आलेला ना हरकत दाखला हा बनावट असल्याचे निष्पन्न झाले. सदर बनावट दाखल्यावर कारवाई करण्याचे अधिकार ग्रामपंचायत असल्याने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार योग्य ती कारवाई करण्याचे आदेश गटविकास अधिकारी शिवाजीराव पाटील यांनी 3 जुलै 2023 रोजी दिले. बनावट दाखला सादर करण्यावर 12 ऑगस्टपर्यंत कार्यवाही करावी असा अल्टिमेटम देण्यात आला.
परंतु या संदर्भात कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्यामुळे आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पंचायत समिती समोर धरणे आंदोलन सुरू केले याचबरोबर सौर प्रकल्प ची उभारणी करणाऱ्या कंपनीच्या पत्राच्या आधारावर बेकायदेशीरित्या ठराव करणाऱ्या ग्रामसेवकावर कारवाई देखील करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अशोक माने प्रसिद्ध प्रमुख अंकुश शेंबडे दामोदर शेंबडे नारायण शेंबडे समाधान शेंबडे संजय सरवदे,विठ्ठल सरवदे आधी उपस्थित होते.
अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला वंचित बहुजन आघाडीने धरणे आंदोलन सुरू करून दुष्काळजीपणा करणाऱ्या पंचायत समिती प्रशासनाचे वाभाडे काढले त्यामुळे हे आंदोलन किमान एक दिवसासाठी मागे घ्यावी अशी विनंती करण्यात आली होती परंतु आंदोलकांनी त्यांची विनंती फेटाळून लावली
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.