सोलापूर

फेसबुकवर खोटी माहिती पसरवली; शांतता कमिटी सदस्यांसह चौघांवर गुन्हा 

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : लॉकडाउन आदेश मोडणाऱ्यांवर पोलिसांकडून शिक्‍के मारले जाणार आहेत, अशी पोस्ट फेसबुकवरून खोटी माहिती पसरवल्याप्रकरणी शांतता कमिटीच्या सदस्यांसह चौघांवर सायबर पोलिस ठाण्याने गुन्हा दाखल केला आहे. 

आईची औषधे आणण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यालाच बसले फटके!

अमर ज्ञानदेव पवार (रा. जय मल्हार चौक, बुधवार पेठ, सोलापूर), लक्ष्मण बाबूराव गायकवाड (रा. उत्तर सदर बझार, सोलापूर), विक्रम रामचंद्र वाडे (रा. उत्तर सदर बझार, सोलापूर), सुरेश सिद्राम पाटुळे (रा. उत्तर सदर बझार, सोलापूर) अशी आरोपींची नावे आहेत. यातील दोघे आरोपी हे शांतता कमिटीचे सदस्य असल्याचे सांगण्यात आले. पोलिस आयुक्तालयातर्फे विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर शिक्के मारण्यात येणार आहेत, असे सांगून पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांचे छायाचित्र फेसबुकवरील पोस्टमध्ये वापरण्यात आले होते. 

"कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर कोणत्याही प्रकारे खोटी माहिती पसरवणे, व्हिडिओ अपलोड करणे, कोरोना संक्रमित रुग्णांची नावे प्रसिद्ध करणे, अफवा पसरवणे कायद्याने गुन्हा आहे. अशा लोकांवर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला जात असून एक वर्ष कारावास आणि दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. 
- अरुण फुगे, 
पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT