cyber crime.jpg 
सोलापूर

सोशल मिडियांवर महिलांचे बनावट प्रोफाईल व फोटो गैरवापराच्या साठ तक्रारी दाखल

अमोल व्यवहारे

सोलापूर : सोशल मीडियावर महिलांना त्रास देण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. शहरात अशा प्रकारच्या तक्रारींचे प्रमाण अधिक असून सायबर पोलिस ठाण्याकडे याबाबत आतापर्यंत सुमारे 60 तक्रारी अर्ज आले आहेत. आतापर्यंत दोन गुन्हे दाखल झाले आहेत. 
सोशल मीडियावर महिलांचे बनावट प्रोफाइल तयार करून त्रास देणे, बदनामीकारक मजकूर व फोटो पोस्ट करणे, फेसबुक प्रोफाईल हॅक करणे, मोबाईल क्रमांक पोस्ट करणे अशा प्रकारच्या तक्रारींमध्ये वाढ होताना दिसते. मोबाईल आणि इंटरनेट सेवा ही आता सामान्य बाब झाली आहे. अनेक जण सोशल मीडियाचा वापर करतात. मात्र त्यामधील धोके अनेकांना माहीत नाहीत. अनेक तरुण-तरुणी कमी वयात असताना देखील खोटी माहिती देऊन सोशल मीडियावर खाते उघडतात. अशा तरूणी सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात सहज सापडतात. 
सायबर सेलकडे फेसबुकवर बनावट अकाऊंट तयार करणे, व्हाट्‌सऍप वरून अश्‍लील संदेश पाठवणे, मुलींच्या फोटोंचा गैरवापर करणे, फेसबुक अकाऊंट हॅक करून खंडणी उकळणे अशा तक्रारींची संख्या जास्त आहे. सायबर सेल पोलीसांकडे चालू वर्षात याबाबत जवळपास 60 तक्रारी अर्ज प्राप्त झाले आहेत. तसेच या तक्रारींची चौकशी करताना दोन गुन्हे देखील पोलिसांनी दाखल केले आहे. 

सुरक्षिततेचा उपयोग व्हावा 
सोशल मीडियाचा वापर करताना तरुणी व महिलांनी विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. व्हॉट्‌सऍपवर ठेवलेले डीपी अनोळखी व्यक्तींना दिसू नयेत याची तांत्रिक सोय करण्यात आली आहे. मात्र याची माहिती अनेकांना नसते. फेसबुक, व्हाट्‌सअपची माहिती, सोशल मीडियावर टाकलेला फोटोचा दुरुपयोग झाल्याच्या घटना समोर येतात. वैयक्तिक माहितीचा गैरवापर झाल्याचे प्रकारही घडले असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women Reservation Bill: महिला आरक्षण विधेयक पडलं, पण संपलं नाही! आता मंजुरीसाठी सरकार कोणती रणनीती आखणार? ‘हे' ५ पर्याय गेमचेंजर ठरणार

GT vs KKR Live : कॅमेरून ग्रीनला सूर गवसला, ११ चेंडूंत कुटल्या ५२ धावा; पण, कोलकाताने २६ धावांत ५ विकेट्स गमावल्या अन्...

Maharashtra CM Relief Fund : ४० हजार रुग्णांना जीवदान! मुख्यमंत्री निधीतून ३३३ कोटींची मोठी मदत, जाणून घ्या कसा मिळतो फायदा

GT vs KKR Live: कॅमेरून ग्रीनचा 'माँस्टर' Six! महागड्या Sierra गाडीला डेंट... TATA देणार ५ लाख, जाणून घ्या नेमकं प्रकरण, Video

Women Reservation Bill : "भारतानं पाहिलं, इंडिया आघाडीनं रोखलं," महिला आरक्षण नामंजूर होताच राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT