Dethe 
सोलापूर

महूद येथे तरुणाची आत्महत्या ! पोलिसांनी मारहाण करून दबावात आणल्याचा कुटुंबीयांचा आरोप

उमेश महाजन

महूद (सोलापूर) : अकरावीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याच्या गुन्ह्याची चौकशी करताना पोलिस तपास अधिकाऱ्याने तरुणास बेदम मारहाण करून घरी सोडून दिले. मारहाणीमुळे दबावाखाली आलेल्या या तरुणाने चिकमहूद (ता. सांगोला) येथे आपल्या घरासमोरील झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली. संबंधित तपास अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी युवकाच्या कुटुंबीयांनी केली आहे. 

सांगोला तालुक्‍यातील चिकमहूद येथे राहणाऱ्या दादासाहेब शंकर देठे या तरुणाने काल (सोमवारी) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आपल्या राहत्या घरासमोरील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. चिकमहूद येथे राहणाऱ्या एका मुलीच्या भावाने दादासाहेब देठे याच्या विरोधात रविवारी (ता. 7) अल्पवयीन बहिणीला पळवून नेल्याची तक्रार नोंदवली होती. या तक्रारीची चौकशी करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याने रात्री उशिरा दादासाहेब देठे यास महूद येथील पोलिस कार्यालयात बोलावून चौकशी केली. या वेळी या तरुणाची आई व बहीणही त्याच्यासमवेत होती. 

चौकशी दरम्यान तपास करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याने दादासाहेब देठे यास प्रचंड दबावाखाली घेतले आणि बेदम मारहाण केली. शिवाय हे प्रकरण मिटवण्यासाठी आर्थिक व्यवहाराची मागणी करून घरी सोडून दिले. या सर्व प्रकारामुळे या तरुणाचे मानसिक स्वास्थ्य बिघडून त्याने आत्महत्या केली, असा आरोप या तरुणाच्या कुटुंबीयांनी केला आहे. संबंधित पोलिस कर्मचाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केल्याशिवाय या तरुणाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घेऊन जाऊ नये, अशी मागणी करत संबंधित तरुणाच्या कुटुंबीयांनी पोलिसांना मज्जाव केला होता. सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत हुले व इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी याबाबत कुटुंबीयांची समजूत काढून योग्य तो तपास केला जाईल, असे सांगितल्यानंतर सायंकाळी उशिरा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सांगोल्याला पाठवण्यात आला. 

पोलिस कर्मचाऱ्यांच्या जाचामुळे युवकास आत्महत्या करावी लागली आहे. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांना न्याय देण्याकरिता संबंधित पोलिस कर्मचाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जाणार नाहीत, अशी भूमिका आरपीआय कार्यकर्त्यांनी घेतल्याचे सांगितले. रात्री उशिरापर्यंत याबाबत कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता. 

अल्पवयीन मुलीस पळविल्याची तक्रार सांगोला पोलिसात दाखल आहे. त्याची चौकशी केली असता मुलगी सापडली आहे. मुलीने मैत्रिणीकडे गेली असल्याचे सांगितल्याने मुलीला व दादा देठे यास नातेवाइकांच्या ताब्यात दिले होते. सोमवारी पोलिस सटेशनमध्ये फिडबॅक देण्यासाठी बोलावले होते. तिथे मुलीच्या वैद्यकीय तपासणीचा विषय निघाल्यानंतर मुलगा बाहेर पडला. त्यानंतर आत्महत्येची खबर मिळाली. कर्मचारी तपास करत असल्याने त्यावर आरोप होत आहेत. 
- पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जरांगेंनी तिसऱ्यांदा मागितली परवानगी, फक्त ५० जण, वेळ पाळणार आणि शांततेत आंदोलन; मुंबई पोलिसांना दिलं हमीपत्र

Maratha Reservation: मनोज जरांगेंच्या सुरक्षेत वाढ; अंतरवाली सराटी ते मुंबई प्रवासात विशेष सुरक्षा पथक तैनात

Latest Marathi News Update : कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही...: राज ठाकरेंच्या टीकेचा रोष कोणाकडे

Rishi Panchami 2026: ऋषिपंचमीला नांगर न लागलेल्या रानभाज्यांचा नैवेद्य का दाखवला जातो? जाणून घ्या धार्मिक अन् वैज्ञानिक कारण!

Police Officer Death: अचानक प्रकृती बिघडली अन् रक्ताची उलटी झाली; २५ वर्षीय महिला पोलिसाची मृत्यूशी झुंज अपयशी

SCROLL FOR NEXT