family dispute gun firing on two crime police arrested three sakal
सोलापूर

Solapur Crime : कौटुंबीक वादातुन दोघावर गोळीबार मोहोळ तालुक्यातील घटना

कौटुंबिक वादातून दोघा जणावर गोळीबार करण्यात आला, मात्र तो प्रयत्न यशस्वी झाला.

राजकुमार शहा

मोहोळ : कौटुंबिक वादातून दोघा जणावर गोळीबार करण्यात आला, मात्र तो प्रयत्न यशस्वी झाला. हा प्रकार शेटफळ- पंढरपूर महामार्गावरील आष्टी शिवारात शनिवार ता 13 रोजी रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास घडला.

दरम्यान या प्रकरणी संशयावरून पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली आहे, या प्रकरणी मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. मोहोळ पोलिसां कडून मिळालेल्या माहिती नुसार, पटवर्धन कुरोली ता पंढरपूर येथील रहिवाशी सिद्धेश्वर ब्रह्मदेव नाईकनवरे व त्याचा नातेवाईक आदित्य व्यवहारे हे दोघे मोटरसायकल वरून घराकडे निघाले होते.

त्याचवेळी तिघा अज्ञातानी विना नंबर प्लेटच्या मोटरसायकलवर येऊन त्यांची मोटरसायकल अडवली व तिघांपैकी एकाने त्याच्या जवळ असलेल्या बंदुकीतून गोळीबार केला. मात्र तो फसला. दरम्यान आपल्यावर हल्ला होतोय समजल्यावर नाईकनवरे व व्यवहारे हे दोघे जीव वाचविण्यासाठी ऊसात पळून गेले, तर संशयित मोटरसायकल वरून पळून गेले. पळून गेलेले संशयित हे 25 ते 30 वयोगटातील होते.

या घटनेची माहिती मिळताच मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, पोलीस उपनिरीक्षक पी पी झालटे यांनी तातडीने घटनास्थळ गाठले व पाहणी केली. त्याच वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळावर दाखल झाले.

घटनास्थळा वरून पोलिसांनी दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. संशयीतांच्या शोधात पोलीस पथक पाठवण्यात आले असून, सीसीटीव्ही फुटेज व काही धागेदोरे मिळतात का ते पोलिसांचे तपासण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणी सिद्धेश्वर ब्रह्मदेव नाईकनवरे यांनी मोहोळ पोलिसात फिर्याद दिली असून, अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पी पी झालटे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT