Farmer of Mohol cut grapeyards agriculture debt on farmer solapur sakal
सोलापूर

Solapur : मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी चालवला द्राक्ष बागेवर कोयता; पण कशासाठी?

द्राक्ष बागा लागवड करण्यापूर्वी वीस ते पंचवीस लाख रुपये शिल्लकीत असणारा शेतकरी सध्या दहा ते पंधरा लाख रुपये कर्जात

राजकुमार शहा

मोहोळ : अपार कष्ट करून लाखो रुपये खर्च करून ही अपेक्षित दर न मिळाल्याने मोहोळ तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी वैतागुन द्राक्ष बागावर कोयता चालवून त्या मुळा सकट उपटून टाकू लागले आहेत. द्राक्ष बागा लागवड करण्यापूर्वी वीस ते पंचवीस लाख रुपये शिल्लकीत असणारा शेतकरी सध्या दहा ते पंधरा लाख रुपये कर्जात आहे हे वास्तव आहे.

मोहोळ तालुक्यातील सीना, भीमा, हरणा या नद्या, आष्टी जलाशय, आष्टी व शिरापूर उपसा सिंचन योजना या पाणी स्त्रोतामुळे मोठे क्षेत्र बागायती झाले आहे. त्यामुळे या परिसरात मुख्य पीक ऊस हेच आहे. मात्र ऊस गाळपास जाताना होणारा विलंब, त्यात होणारे राजकारण व वेळेत न मिळणारे पैसे यामुळे ऊस लागवडीकडे शेतकऱ्यांनी कानाडोळा केला आहे. ऊसाला पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी द्राक्ष, पेरू, सीताफळ, आंबा, केळी या फळबागांची लागवड केली आहे.

द्राक्षा पासून चांगले अर्थार्जन होत असल्याने मोहोळ तालुक्यात ठराविक भागात द्राक्ष बागांची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे. द्राक्षाचा दुहेरी फायदा आहे. एक तरी द्राक्ष विक्री व दर अपेक्षित नसेल तर त्याचा बेदाणा तयार करून तो विक्री करता येतो. द्राक्ष लागवड करताना सुरुवातीला एकरी सर्व खर्च मिळून सुमारे 20 लाख रुपये येतो. त्यात अँगल, तार, रोपे व मजुरी व शेतीची मशागत आदीचा समावेश आहे.

मात्र गेल्या तीन-चार वर्षापासून या सगळ्यांनाच घरघर सुरू झाली आहे. द्राक्षे काढणीच्या वेळी नेमका अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे दर मिळत नाही, शिवाय कोरोना महामारीतही शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अनेक भागात लाखो रुपये खर्च करून ही बागा "फेल" गेल्या आहेत. बाग जरी फेल गेली तरी तिला करावा लागणार खर्च हा करावाच लागतो. त्यामुळे "जवळचे गेले व कर्ज झाले" अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे.

विशेष म्हणजे पापरी परिसरातील द्राक्ष मुंबई, चेन्नई, दिल्ली आदी ठिकाणचे व्यापारी बागेत येऊन खरेदी करतात. मात्र व्यापा-यांचे शेतकऱ्यापेक्षा हवामान अंदाजा कडे जास्त लक्ष आहे. हवामान अंदाज खराब सांगितला तर व्यापारी खरेदीला येतच नाहीत. द्राक्ष ही ठराविक वेळेतच काढावी लागतात, अन्यथा काढणीच्या पुढे गेले की नुकसान होते.

याच संधीचा फायदा व्यापारी घेतात. ते कमी दराने खरेदी करतात. शेतकऱ्यांना म्हणतात तिकडे गिऱ्हाईक नाही व तिकडच्या गिऱ्हाईकाला म्हणतात ग्रामीण भागात माल मिळत नाही. यात व्यापारी व त्यांचे गावोगावचे दलाल 'आर्थिक स्ट्राँग" झाले आहेत. शेतकरी मात्र देशोधडीला लागला आहे हे खरे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ambajogai Robbery Case : अंबाजोगाईतील 'हायप्रोफाईल' घरफोडीचा एलसीबीकडून छडा; फरार म्होरक्याला बेड्या, कोट्यवधींचा ऐवज जप्त

Otur News : खासगी क्लासेसवर अंकुश कोणाचा? कठोर पावले उचलण्याची गरज

Asian Games: शेवटच्या दिवशी ५ GOLD! कुमकुम, अमन, प्रणवीपाठोपाठ हॉकी-क्रिकेट संघांची सुवर्ण कामगिरी; भारताच्या खात्यात ८५ मेडल्स

Beed News : उच्च पगाराचे आमिष! म्यानमारच्या सायबर नरकात अडकल्या ३२ मराठी जिवांची होणार सुटका; बीडच्या स्वप्नील काळुंकेसह भारतीयांसाठी म्यानमार सरकार करणार 'रेस्क्यू ऑपरेशन'

Pune News : पुणे शहरातील २४ संवेदनशील ठिकाणी अंधाराचे साम्राज्य

SCROLL FOR NEXT