grapes  
सोलापूर

'अवकाळी'तून वाचलेला शेतकरी "कोरोना'मध्ये अडकला 

प्रमोद बोडके

सोलापूर : हातातोंडाशी आलेले द्राक्ष आणि केळीचे पीक गेल्या आठवड्यातील अवकाळी पावसाने हिरावून नेले. ज्यांच्या बागा वाचल्या ते शेतकरी आता कोरोनाच्या संकटात सापडले आहेत. सोलापूरची द्राक्ष आणि केळी ज्या देशात निर्यात होतात, त्या देशांनी कोरोनाच्या भीतीने लॉकडाऊन केले आहे. त्याचा परिणाम विमानामार्गे होणाऱ्या निर्यातीवर झाला आहे. जहाजातून होणारी निर्यात सध्या तरी सुरू आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जागतिक पातळीवर येत्या दोन ते तीन दिवसांत काय निर्णय होतात? याकडे जिल्ह्यातील निर्यातदार शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. 
हेही वाचा - "कोरोना नाही तरी" या शहरातील उद्योग-व्यवसायाला फटका 
द्राक्ष, डाळिंब आणि केळी अशा तीन महत्त्वाच्या फळपिकांसाठी सोलापूर जिल्ह्याची ओळख आहे. जिल्ह्यातील ज्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी मृग बहार घेतला, त्यांच्या डाळिंबाची यापूर्वीच विक्री झाल्याने ते निश्‍चिंत आहेत. आंबिया बहारातील शेतकऱ्यांचे डाळिंब बाजारात येण्यास आणखी विलंब आहे. त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी कोरोनाच्या संकटातून वाचले आहेत. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मात्र कोरोनाचा त्रास सहन करावा लागत आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माढा आणि माळशिरस या तालुक्‍यांतील केळीची इराण, बांगलादेश या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात निर्यात होते. कोरोनामुळे या देशांतील निर्यातीवर परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. 
हेही वाचा - त्याच्या शिक्षणासाठी भावाने सोडले शिक्षण 
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, माळशिरस आणि पंढरपूर तालुक्‍यातील द्राक्षाची मोठ्या प्रमाणात निर्यात होते. या देशातील द्राक्ष बांगलादेश, आखाती देश, युरोपीय देश, युनायटेड नेशन या भागात निर्यात केले जातात. या देशांवरही कोरोनाचे संकट घोंघावत असल्याने त्याचा परिणाम कृषी मालाच्या निर्यातीवर होऊ लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी या देशांनी विमानसेवा बंद ठेवण्याचा व कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या देशात विमानामार्गे जाणाऱ्या शेतमालावर मर्यादा आल्या आहेत. 


 महाराष्ट्र 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Second Phase Schedule: इंडियन प्रीमिअर लीगच्या पुढील ५० सामन्यांचे वेळापत्रक जाहीर, १३ एप्रिल ते २४ मे रोजी रंगणार सामने

युद्धामुळे संकट! केंद्र सरकार मोठा निर्णय घेणार? PM मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार, बोलावली बैठक

ट्रॅफिकला ब्रेक लागणार! १ तासाचा प्रवास आता फक्त १० मिनिटांत होणार; पूर्व-पश्चिम मुंबई जोडणारा गेमचेंजर प्रकल्प आहे तरी काय?

Mumbai News: मिठी नदीची साफसफाई केली जाणार, नऊ लाख टन गाळ उपशाचे उद्दिष्ट; कधीपासून काम सुरू होणार?

तुम्हाला माहिती आहे का? ‘धुरंधर’चं शूटिंग संजय दत्तच्या शाळेतच झालंय! 'हे' कलाकारही आहेत माजी विद्यार्थी

SCROLL FOR NEXT