दरवर्षी 15 ऑगस्टपर्यंत भरणारे उजनी धरण यंदा 62 टक्‍क्‍यांवरच घुटमळतेय ! Canva
सोलापूर

दरवर्षी 15 ऑगस्टपर्यंत भरणारी 'उजनी' यंदा 62 टक्‍क्‍यांवरच घुटमळतेय !

दरवर्षी 15 ऑगस्टपर्यंत भरणारे उजनी धरण यंदा 62 टक्‍क्‍यांवरच घुटमळतेय !

राजाराम माने : सकाळ वृत्तसेवा

राज्यातील सर्वात मोठे समजले जाणारे उजनी धरण दरवर्षी 15 ऑगस्ट दरम्यान पूर्ण क्षमतेने भरते; परंतु यावर्षी मात्र ते 62 टक्‍क्‍यांच्या आसपासच घुटमळत आहे.

केत्तूर (सोलापूर) : सध्या पावसाने मोठा ब्रेक घेतल्याने उजनी जलाशयात येणारा विसर्ग कमी झाला आहे. राज्यातील सर्वात मोठे समजले जाणारे उजनी धरण (Ujani Dam) दरवर्षी 15 ऑगस्ट दरम्यान पूर्ण क्षमतेने भरते; परंतु यावर्षी मात्र ते 62 टक्‍क्‍यांच्या आसपासच घुटमळत आहे. आता आगामी काळात धरण भरणार का? आणि पूर्ण क्षमतेने न भरल्यास आगामी वर्षासाठी झालेल्या पाण्याचे नियोजन कसे होणार? याची चिंता मात्र उजनी लाभक्षेत्र तसेच पाणलोट क्षेत्रातील शेतकऱ्यांना (Farmers) लागली आहे.

या वर्षी उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात उजनी पाणीसाठा मायनस 23 टक्‍क्‍यांवर गेला होता. परंतु, पाऊस सुरू झाल्यानंतर 22 जुलै रोजी धरणाच्या पाणीसाठ्याची वाटचाल मायनसला मागे सारून प्लसकडे होण्यास सुरवात झाली होती. आता सध्या पावसाने उघडीप दिली आहे, त्यामुळे वरच्या भागातून पाणी येण्याची शक्‍यता कमी होत आहे. जून, जुलै दरम्यान पुणे जिल्हा परिसर, भीमा खोरे तसेच धरण साखळीत झालेल्या पावसाच्या बळावरच उजनी धरणाचा पाणीसाठा 62 टक्‍क्‍यांवर गेला आहे. पावसाने मोठा ब्रेक घेतल्याने खरिपाच्या पेरण्या वाया जाणार आहेत. दरवर्षी पुणे जिल्हा परिसरात पडणाऱ्या पावसामुळे नदी, नाले, ओढे खळखळून वाहत असल्याने उजनी धरण 15 ऑगस्ट दरम्यान पूर्ण क्षमतेने भरते. मात्र या वेळेस पावसानेही मोठा ब्रेक घेतल्याने धरणाचा पाणीसाठा जवळजवळ 38 टक्‍क्‍यांनी शतकापासून अद्यापही दूर आहे.

16 ऑगस्ट रोजी धरणाची स्थिती...

  • पाणी पातळी : 495.995 मीटर

  • उपयुक्त पाणीसाठा : 97.01 टीएमसी

  • टक्केवारी : 62.26

उजनीत येणारा विसर्ग...

  • दौंड : 2717 क्‍युसेस

  • बंडगार्डन : 3280 क्‍युसेस

उजनीतून जाणारा विसर्ग...

  • सीना-माढा : 259 क्‍युसेस

  • दहिगाव : 126 क्‍युसेस

  • बोगदा - 150 क्‍युसेस

पुणे जिल्ह्यातील धरण साखळीतील सर्व धरणे जवळजवळ पूर्ण क्षमतेने भरली आहेत, तरी उजनी धरण मात्र पूर्ण क्षमतेने भरले नाही. उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरणे गरजेचे आहे अन्यथा उन्हाळ्यात शेतकऱ्यांचे हाल होणार आहेत. सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यासाठी उजनी धरण हे वरदायिनी समजले जाते. हे धरण पूर्ण क्षमतेने न भरल्यास शेतीबरोबरच कारखाने, औद्योगिक वसाहती संकटात येऊन आर्थिक संकट सर्वांनाच भेडसावणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyclone Shakti: शक्ती चक्रीवादळ कुठे पोहोचले? धोका नेमका कधी टळणार? हवामान खात्याकडून तारीख जाहीर

Ramdas kadam : रामदास कदम यांचा आणखी एक खळबळजनक दावा, थेट उद्धव ठाकरेंना आव्हान

Crime News : गोळीबार प्रकरण: पंचवटी पोलिसांकडून १४वा संशयित जेरबंद, आतापर्यंत माजी नगरसेवकासह १४ अटकेत

World Cup 2025: भारताविरुद्ध पाकिस्तानने टॉस जिंकला, प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल; हस्तांदोलन झालं की नाही?

Sangli Accident Death : काम संपवून घरी निघाला होता, समोरू दुचाकी आली अन् दोघेही जाग्यावर संपले; सांगलीतील घटना

SCROLL FOR NEXT