Sugarcane 
सोलापूर

जो कारखाना लगेच तोड देईल त्यालाच ऊस देणार ! शेतकरी वर्ग झाला सतर्क 

सुनील राऊत

नातेपुते (सोलापूर) : माळशिरस तालुक्‍यातील ऊस उत्पादकांनी आपल्या शेतातील ऊस जो कारखाना लगेच तोड देईल त्यांना देण्याचा मनोमन विचार केला आहे. त्यामुळे गळितासाठी ऊस जाण्यासाठी शेतकरी वर्ग झाल्याचे दिसून येत आहे. 

विजयादशमीच्या मुहूर्तावर शंकरनगर येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. पहिल्या दिवशी नातेपुते व पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील ऊस गळितासाठी पाठविला आहे. तसेच फलटण तालुक्‍यातील खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांच्या स्वराज साखर कारखाना व पवार यांच्या शरयू साखर कारखाना यांच्याकडेही अनेकांनी आपला ऊस पाठवला आहे. 

सदाशिवनगर येथील श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम यावर्षी जानेवारीत सुरू होईल, असा मनोदय संचालक मंडळाने व्यक्त केला असून, या कारखान्यावर ऊस उत्पादक, बॅंकांचे, पुरवठादार लोक, कामगारांची देणी मोठ्या प्रमाणात आहे. या कारखान्याचा हा गळीत हंगाम सुरू होण्यासाठी 250 कोटी रुपयांची गरज आहे. विद्यमान चेअरमन आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी राज्य शासन व केंद्र सरकारकडे जास्तीत जास्त निधी मिळावा असा प्रयत्न सुरू केला आहे. तरीही जोपर्यंत सर्वांची मागील देणी दिली जात नाहीत, तोपर्यंत गळीत हंगामास परवाना मिळेल असे वाटत नाही. त्यामुळे मोहिते-पाटील परिवाराच्या जवळच्या अनेक कार्यकर्त्यांनी या कारखान्यावर विसंबून न राहता आपल्या शेतातील उभा ऊस जो कारखाना ऊस तोडणी लवकर देईल त्यांना देण्याचा सपाटा लावला आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT