Banana 
सोलापूर

शालेय पोषण आहारात करा केळीचा समावेश ! करमाळातील शेतकऱ्यांनी केली जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी 

गंगाधर पोळ

चिखलठाण (सोलापूर) : करमाळा तालुक्‍यातील सध्या अडचणीत असलेल्या केळी उत्पादकांना दिलासा देण्यासाठी शालेय पोषण आहारात केळीचा समावेश करावा, अशी मागणी तालुक्‍यातील शेतकऱ्यांमधून होत आहे. दरम्यान, शेटफळ (ता. करमाळा) येथील लोकविकास फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत एक निवेदनही देण्यात आले आहे. 

करमाळा तालुक्‍यातील केळी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. गेल्या तीन-चार वर्षात केळीला चांगला दर मिळत होता. परंतु या वर्षीच्या हवामान बदलाचा परिणाम या पिकावर झाला असून केळी निर्यातीसाठी अडचणी येऊ लागल्याने केळीचा स्थानिक बाजारपेठेतील दर घसरला आहे. सध्या तालुक्‍यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना तीन ते चार रुपये किलोप्रमाणे केळी विकण्याची वेळ आली आहे. हे लक्षात घेऊन शालेय पोषण आहार व महिला बाल विकास विभागाच्या वतीने येणाऱ्या अंगणवाडी व स्तनदा माता यांना मिळणाऱ्या आहारात केळीचा समावेश करून शासनाच्या वतीने अथवा शेतकरी गटाच्या वतीने शेतकऱ्यांची केळी योग्य दरात खरेदी करण्याची मागणी शेटफळ येथील लोकविकास फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीच्या वतीने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना करण्यात आली आहे. 

याशिवाय निर्यातक्षम केळी उत्पादनासाठी तालुक्‍यात केळी संशोधन केंद्र उभारण्यात यावे, वादळी वाऱ्यासह पावसाने नुकसान झालेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना भरपाई मिळावी, तालुक्‍यात माती, पाणी व रासायनिक खतांच्या परीक्षणासाठी शासनाच्या वतीने अद्ययावत प्रयोगशाळा उभारण्यात यावी, पॅक हाउस व शीतगृह उभारणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने अनुदान देण्यात यावे, तालुक्‍यातील केळी उत्पादक भागातील खराब रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, शेती पंपाला करण्यात येणारा वीजपुरवठा दिवसा व पुरेशा दाबाने करण्यात यावा, अशा विविध मागण्यांचे निवेदन कंपनीचे अध्यक्ष विष्णू पोळ, विजय लबडे, नानासाहेब साळुंके, वैभव पोळ, प्रशांत नाईकनवरे, महावीर निंबाळकर यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना दिले आहे. 

या वेळी केळी उत्पादकांच्या अडचणी तातडीने सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI News: WhatsApp वर RBI चा मेसेज आला? खिशातील रुपया आता मोबाईलमध्ये! डिजिटल रुपया म्हणजे काय आणि तो कसा वापरायचा जाणून घ्या

Team India : सूर्यकुमार यादवसाठी दरवाजे अजूनही खुले... माजी कर्णधाराचे टीम इंडियात पुनरागमन शक्य... जाणून घ्या, कसं!

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय पेरांबूरला भेट देत आहेत

IND vs ENG: 'Lords' वर देव! भारतीय महिला खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी पोहोचला सचिन तेंडुलकर Video

Devkund News: देवकुंड डोहात बुडालेल्या दोन्ही तरुणांचे मृतदेह 50 फूट खोल डोहात सापडले; अवघ्या पंधरा मिनिटात रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी

SCROLL FOR NEXT