14 दिवसांत 'एफआरपी' देणाऱ्या कारखानदाराला एक एकर जमीन बक्षीस! Canva
सोलापूर

14 दिवसांत 'एफआरपी' देणाऱ्या कारखानदाराला एक एकर जमीन बक्षीस!

14 दिवसांत 'एफआरपी' देणाऱ्या कारखानदाराला एक एकर जमीन बक्षीस!

भारत नागणे - सकाळ वृत्तसेवा

ऊसउत्पादक शेतकऱ्याने साखर कारखानदारांना दिलेले खुले आव्हान साखर कारखानदार स्वीकारणार का, याकडेच आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

पंढरपूर (सोलापूर) : या वर्षीच्या गळीत हंगामामध्ये सोलापूर जिल्ह्यातील (Solapur) जो साखर कारखानदार (Sugar Mill) पहिल्यांदा एफआरपीची संपूर्ण रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर 14 दिवसांच्या आत जमा करेल, अशा साखर कारखानदाराच्या नावावर स्वत:ची एक एकर जमीन करण्याचा निर्णय पंढरपूर (Pandharpur) तालुक्‍यातील सुस्ते या गावातील विजयकुमार नागटिळक (Vijaykumar Nagtilak) या शेतकऱ्याने जाहीर केला आहे. त्यांच्या या आगळ्यावेगळ्या निर्णयाची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. या ऊस उत्पादक शेतकऱ्याने साखर कारखानदारांना दिलेले खुले आव्हान साखर कारखानदार स्वीकारणार का, याकडेच आता पंढरपूरसह सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

राज्यात सर्वाधिक साखर कारखाने आहेत व सर्वाधिक ऊस उत्पादन सोलापूर जिल्ह्यात होते. उसाचा दर आणि शेतकरी संघटनेचे आंदोलन हे नेहमीच चर्चेचा विषय असतो. यावर्षीही एफआरपीच्या मुद्द्यावरून शेतकरी संघटना विरुद्ध साखर कारखानदार यांच्यात संघर्ष अटळ मानला जात आहे. अशातच सुस्ते येथील एका शेतकऱ्याने चक्क साखर कारखानदारांना एक एकर जमीन बक्षीस म्हणून देण्याचे जाहीर केले आहे.

जो कोणी साखर कारखानदार पहिल्यांदा एफआरपीची रक्कम 14 दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करेल त्या साखर कारखानदाराच्या नावावर स्वतःची एक एकर जमीन देणार आहे. त्यांचे हे ओपन चॅलेंज सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदार स्वीकारणार का, याविषयी आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात जवळपास 40 साखर कारखाने आहेत. या कारखान्यांमधून दरवर्षी एक कोटी टनाहून अधिक उसाचे गाळप होते. सर्वाधिक ऊस आणि साखर उत्पादन करणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नेहमीच साखर कारखानदारांविरुद्ध ऊस दरावरून संघर्ष करावा लागतो. आता हा संघर्ष शेतकऱ्यांना नकोसा झाला आहे. त्यामुळे आता थेट नागटिळक या शेतकऱ्याने साखर कारखानदारांना खुले आव्हान देत कोंडीत पकडले आहे. त्यांचे हे खुले आव्हान सोलापूर जिल्ह्यातील किती साखर कारखानदार स्वीकारणार, याकडेच सोलापूर जिल्ह्यातील हजारो ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT