piliv. 
सोलापूर

खासदार, आमदार यांनी दिलेला शब्द पुकळे यांनी केला पूर्ण

शुभजित नष्टे

पिलीव (सोलापूर) : माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे अतीवृष्टीमुळे बळीराजा अडचणीत आहे. पाण्याच्या प्रवाहामुळे बरेच रस्ते वाहून गेले आहेत. यामध्ये  पिलीव येथील जामदार वस्तीकडे जाणारा रस्ता वाहून गेला, आणि पिलीव हद्दीतील हत्तीबुडी तलाव भरुन वाहत असल्यामुळे जवळपास 100 घरांची लोकवस्ती असलेल्या जामदारवस्तीचा पिलीव गावाशी संपर्क तुटला. लोकांना जीवनावश्यक वस्तू, दुधाची नेआण करणे बंद झाली, त्यामुळे खूप नुकसान झाले. 

पिलीवमध्ये आमदार रामभाऊ सातपुते यांनी अतीवृष्टीच्या नुकसानीचा पाहणी दौरा केला. यावेळी पिलीव मनसेच्या वतीने आमदार रामभाऊ सातपुते यांना याचे निवेदन दिले. तसेच त्यानंतर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनीही पिलीव भागाचा दौरा केला. त्यावेळी जामदारवस्तीच्या लोकांनी आपल्या व्यथा सांगितल्या. तसेच पिलीव पत्रकार संघाने लोकांच्या अडचणी लक्षात आणून दिल्या. यावेळी खासदार साहेबांनी स्वखर्चाने सिमेंट पाईपचा पूल तयार करून रस्ता करण्याचे आश्वासन दिले. त्याची जबाबदारी खासदार व आमदार दोघांनी युवा नेते मा.शिवराज पुकळे यांच्याकडे दिली. तसेच काही अडचणी असतील तर निःसंकोचपणे शिवराज पुकळे यांच्याकडे भेटा असे सांगितले. 

सामजिक कार्याची जान आणि भान असणारे शिवराज पुकळे यांनी लोकांची अडचण लक्षात घेऊन तातडीने सिमेंट पाइप उपलब्ध करून लोकांची अडचण सोडवली. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या स्वखर्चातून आमदार रामभाऊ सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली युवक नेते शिवराज पुकळे यांच्या प्रयत्नांनी पिलीव (जामदारवस्ती ) हत्तीबुडी तलाव खालील ब्रीज व 2.5 किमी रस्त्याचे मुरमीकरण काम केल्यामुळे जनतेमधून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार रामभाऊ सातपुते व शिवराज पुकळे तसेच काम करून घेणारे कार्यकर्ते यांचे कौतुक होत आहे.

यावेळी युवक नेते शिवराज पुकळे, प्रा.संजय पाटील, प्रमोद भैस, शुभजीत नष्टे, गणेश देशमुख, अमोल मदने, अतुल भैस, मधुकर भिसन, धिरज जामदार, सुरज जामदार, माजी ग्रा.पं.सदस्य सर्जेराव जामदार, दादासाहेब भिसन, विनायक चोबे, अमोल चोबे, नितीन जामदार, अमर जामदार, वैभव खरात, सदा खरात, महावीर खरात व नागरिक उपस्थित होते.

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT