farmers protest water supply cases were filed against agitators solapur
farmers protest water supply cases were filed against agitators solapur  Sakal
सोलापूर

Solapur News : पाण्यासाठी शेतकऱ्यांचा रस्ता रोको आंदोलन; आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल

अक्षय गुंड - सकाळ वृत्तसेवा

उपळाई बुद्रूक (जिल्हा सोलापूर) : सिना माढा उपसा जलसिंचन योजनेच्या पाण्यासाठी संबंधित विभागाकडून शेतकऱ्याच्या ऊस बिलातून पाणीपट्टी कपात करून घेतली जाते. परंतु या योजनेचे सध्या पन्नास दिवसांहून अधिक काळ झाले पाणी सुरू असताना देखील अधिकाऱ्यांच्या निष्काजीपणामुळे उपळाई बुद्रूक परिसरात पाणी येत नसल्याने, पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालल्याने, नागरिकांनी माढा-शेटफळ रस्त्यावर शनिवारी सकाळी जवळपास एक तास रस्ता रोको आंदोलन केले.

यंदा पाऊस कमी झाल्याने, सर्वत्रच दुष्काळाची चाहूल निर्माण झाली आहे. बोअर, विहीरीची पाणी पातळी चांगलीच खालावली असून, शेतकऱ्यांची आशा सिना - माढा उपसा जलसिंचन योजनेच्या पाण्यावर आहे. या योजनेचे पाणी सुरू होऊन जवळपास दोन महिने उलटले असून, या पाण्यासाठी या भागातील शेतकऱ्यांच्या उसातून पाणीपट्टी देखील संबंधित विभागाच्या वतीने कपात करण्यात आली आहे.

तरीदेखील अधिकाऱ्यांच्या निष्काजीपणामुळे या भागांत अद्याप पाणी पोहचले नसल्याने, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी होती. हक्काचे पाणी असताना देखील मिळत नसल्याने, या अधिकाऱ्यांच्या निषेधार्थ व सिना-माढा योजनेचे पाणी तात्काळ मिळावे या मागणीसाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते.

या आंदोलनकर्त्यांना संबंधित विभागाचे कुणीही अधिकारी लेखी उत्तर देण्यासाठी उपस्थित नसल्याने, नागरिकांनी अधिकारी येत नाहीत तोपर्यंत रस्त्यावरच ठिय्या मांडून घोषणा देत जवळपास एक तासभर आंदोलन सुरू ठेवले.

अखेर माढा पोलीसांच्या मध्यस्थीने नायब तहसीलदार विजय लोकरे यांना निवेदन देऊन नागरिकांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. आंदोलन प्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य दीपक देशमुख, तंटामुक्तीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन झाडबुके, माजी सरपंच संजय नागटिळक, मनोज गायकवाड, उपसरपंच नागनाथ गुंड,

धनंजय बेडगे, हरी बेडगे, ईसाक काझी, सज्जन गोरे, भारत जाधव, दत्तात्रय लवटे, नामदेव बाबर, बसवेश्वर आखाडे, अभिषेक देशमुख, बालाजी गोरे, विकास बेडगे, पप्पू डुचाळ, संतोष कवले, प्रदिप बेडगे, सागर शिंदे, राजू नकाते, सिध्देश्वर भांगे,

अजिनाथ बेडगे आदी उपस्थित होते. माढा पोलीसांच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. अभियंत्यांनी व्हाट्सअपवरून दिले लेखी उत्तर

भीमा पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनासंबंधी माहितीच नाही, पत्रच मिळाले नाही, तोंडी उत्तर दिले होते, अशी उडवाउडवीची उत्तरे देत आंदोलनस्थळी येण्यास टाळाटाळ केली, परंतु आंदोलनकर्त्यांची संख्या लक्षात घेता व वेळेचे भान राखत पोलिसांनी मध्यस्थी करत पाटबंधारे विभागाचे अभियंता नारायण आलाट यांच्याकडून व्हाट्सअपद्वारे ता.२६ नोव्हेंबर रोजी पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन घेऊन आंदोलनकर्त्यांना दाखवत रस्ता रोको मागे घेण्यास भाग पाडले.

४० आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल

गैरकायद्याची मंडळी जमवून सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करणे व रस्ता रोखून रहदारीला अडथळा निर्माण केल्याप्रकरणी तसेच जिल्हा दंडाधिकारी यांचे मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी उपळाई बुद्रूक येथील संशयित इसाक काझी, प्रवीण बेडगे,

नागन्नाथ गुंड, दत्तात्रय पाटील, सोमनाथ डुचाळ, मल्लिनाथ झाडबुके, दिगंबर माळी, वसंत पाटील, नामदेव बाबर, आण्णासाहेब भांगे, बालाजी गोरे, बाळू माळी, राजकुमार काटे, मोहन पाटील, संतोष कवले यांच्यासह अज्ञात २० ते २५ आंदोलनकर्त्यांवर माढा पोलीस ठाण्याच्या वतीने भादंविच्या ३४१, १४३ कलम व महाराष्ट्र पोलिस कायदा १३५ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

आंदोलनकर्त्यांना दोन दिवसांपुर्वीच पाणी सोडण्याचे तोंडी आश्वासन दिले होते. तरीदेखील ते आंदोलनावर ठाम होते. उद्यापासून उपळाई भागात टप्प्याटप्प्याने सर्वत्र पाणी पोहचवण्यासाठी प्रयत्न करू. पाणी या भागात जात असताना पाठिमागे कुणी पाणी अडवून घेतल्यास गुन्हे दाखल करणार.

- नारायण आल्हाट अभियंता, भीमा पाटबंधारे विभाग भीमानगर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election : प्रचाराचे वादळ थंडावले ; सातव्या टप्प्यासाठी उद्या मतदान

Kalyani Nagar Accident :भ्रष्ट चेल्यांनी बदलले तिघांचे रक्तनमुने ; ‘ससून’मधील डॉक्टरांची बनवाबनवी

Pune Accident : पुण्यात पुन्हा रॅश ड्रायव्हिंग ; बीआरटी मार्गात घुसवली मोटार

World No Tobacco Day 2024 : हृदय-फुफ्फुसांपासून ते कर्करोगापर्यंत, धूम्रपानामुळे ‘या’ गंभीर आजारांना मिळतेय आमंत्रण

World No Tobacco Day 2024: ‘तंबाखू’वर मात शक्य! हवा फक्त दृढनिश्चय; ‘आरोग्य’ विभागाकडून 2 वर्षात दीड लाखावर समुपदेशन

SCROLL FOR NEXT