The farmers of Solapur district complain to the Collector 
सोलापूर

जगाच्या पोशिंद्याची जिल्हाधिकारी यांच्या हाकेला साद

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर  ः जगाचा पोशिंदा म्हणून ज्या शेतकऱ्याला आपण ओळखतो, त्याच मनही तेवढंच विशाल असतं. कविवर्य विठ्ठल वाघांच्याच ओळीत सांगायचं असेल तर "बाप जवारीचा दांडा... उभ्या जगाला पोसतो, आय जात्यातला दाणा पीठ होऊन हासते...' भेगाळलेलं रान पुनःपुन्हा सांधून त्यातून सोनं पिकवणारा सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी कोरोना विषाणू विरूध्दच्या लढाईत आघाडीवर आहे. जिल्ह्यधिकारी मिलिंद शंभरकर यांनी फक्त एकदा आवाहन केलं, अन्‌ शेतकऱ्यानी घडीचं मोल जाणून तब्बल 402 क्विंटल धान्य जिल्हा प्रशासनाकडे जमा केलं. 

कोरोना विषाणूच्या उपाययोजने अंतर्गत जिल्हाधिकारी शंभरकर यांनी जिल्ह्यातील शेतक-यांना त्यांच्याकडील अतिरिक्त ज्वारीचे दान करण्याकरीता आवाहन केले होते. जिल्हा कृषी अधिकारी बसवराज बिराजदार यांनी याबाबत जिल्ह्यातील कृषी विभागाच्या यंत्रणेला कार्यान्वीत केले. शेतकऱ्यांनी त्यास प्रतिसाद देवून जिल्ह्यातील सर्व तालुक्‍यामधून 303 क्विंटल ज्वारी, 2.5 क्विंटल बाजरी, 79 क्विंटल गहू, 3 क्विंटल तूर, हरभरा डाळ तर 15 क्विंटल तांदूळ आज अखेर जमा केले. 

ग्रामस्तरावर कृषी सहायक, ग्रामसेवक व तलाठी यांच्या मार्फत शेतकरी धान्य जमा करत आहेत. हे जमा झालेले धान्य जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे जमा केले जाईल, असे श्री. बिराजदार यांनी सांगितले. अकक्‍लकोट तालुक्‍यातील कृषी विभागाच्या कर्मचा-यांमार्फत 121 जीवनावश्‍यक वस्तूंचे कीट तयार करुन गरजू लोकांना त्याचे वाटप केले आहे असेही त्यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR Live : मुंबई इंडियन्सने १४ वर्षांचा 'शाप' संपवला! IPL मधील सर्वात मोठा विजय मिळवला; रोहित, रिकल्टनची मॅच विनिंग खेळी

कोल्हापूरची अमृता पुजारी महिला महाराष्ट्र केसरी; वेदिकाला अस्मान दाखवत जिंकली चांदीची गदा अन् कार

अपहरणकर्त्यांचा कॉल ‘तुमचा मुलगा आमच्या ताब्यात, ५० लाख द्या, पोलिसांत गेल्यास मुलाला ठार मारु’; सोलापूर पोलिसांच्या ‘एलसीबी’ची १४ तासांची मेहनत अन्‌...

MI vs KKR Live: रोहित शर्माची IPL इतिहासातील वेगवान फिफ्टी! ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, 'फॅब फोअर'च्या पंक्तित बसला

Land Survey: भूमापन प्रक्रिया होणार वेगवान! फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय; जमीन मोजणीसाठी नवी योजना लागू

SCROLL FOR NEXT