सोलापूर ते उजनी समांतर जलवाहिनी
सोलापूर ते उजनी समांतर जलवाहिनी Canva
सोलापूर

सोलापूर ते उजनी समांतर जलवाहिनीला भरपाईचे विघ्न !

तात्या लांडगे

टेंभुर्णीत जुन्या गावातून पाइपलाइन वळविण्याचा निर्णय झाला, परंतु त्या ठिकाणच्या नुकसान भरपाईचाही विचार केला नाही.

सोलापूर : सोलापूर ते उजनी (Ujani Dam) समांतर जलवाहिनीचे (Pipeline) काम सुरू करण्यापूर्वी बाधित शेतकरी व त्यांच्या नुकसान भरपाईचा अंदाज घेऊन त्यांना भरपाईतील 80 टक्‍के रक्‍कम देऊन ऍडव्हॉन्स पजेशन घेणे आवश्‍यक होते. मात्र, महापालिकेने तसे काहीच केले नाही. टेंभुर्णीत जुन्या गावातून पाइपलाइन वळविण्याचा निर्णय झाला, परंतु त्या ठिकाणच्या नुकसान भरपाईचाही विचार केला नाही. त्यामुळे आता भरपाईशिवाय काम करू देणार नाही, अशी भूमिका त्या शेतकऱ्यांनी घेतल्याने काम रखडणार असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. (Farmers will have to pay Rs 101 crore for the parallel waterway from Solapur to Ujani-ssd73)

सत्ताधारी भाजपने (BJP) समांतर जलवाहिनीचे काम आपल्या काळात व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, विविध तांत्रिक अडचणी आणि शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी पैसा नसल्याने सत्ताधाऱ्यांची पंचाईत झाली आहे. सुरवातीला शेतकऱ्यांच्या नुकसानीची रक्‍कम अंदाजित 50 कोटी असल्याचे महापालिकेला (Solapur Municipal Corporation) तत्कालीन उपजिल्हाधिकाऱ्यांनी कळविले. मात्र, ही रक्‍कम अंदाजित 131 कोटींपर्यंत जाईल, असे विद्यमान उपजिल्हाधिकाऱ्यांनी कळविले. हा विषय उपमुख्यमंत्री अजित पवारांपर्यंत (Deputy Chief Minister Ajit Pawar) पोचला आणि पुन्हा नुकसानीचा सर्व्हे झाला. आता भरपाईपोटी 101 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. दरम्यान, महापालिका आयुक्‍तांनी पाइपलाइनसाठी लागेल तेवढीच जमीन (पाच मीटर) संपादित करून भरपाई द्यावी, असा प्रस्ताव समोर आणला. मात्र, त्यासंदर्भातील कोणताही परिपूर्ण प्रस्ताव आपल्याकडे आला नसल्याची माहिती उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

115 दिवसांत द्यावे लागणार 101 कोटी

सोलापूर ते उजनी 110 किलोमीटर समांतर जलवाहिनीसाठी मोहोळ, उत्तर सोलापूर, माढा या तालुक्‍यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी 101 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. अधिसूचना निघाल्यापासून 180 दिवसांत भरपाईची रक्‍कम संबंधित शेतकऱ्यास देणे बंधनकारक आहे. अन्यथा, पुन्हा सुरवातीपासून भरपाईचा सर्व्हे करावा लागणार असून त्यासाठी किमान दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. 13 मे 2021 रोजी अधिसूचना निघाली असून आता 115 दिवसांत ही भरपाई देणे महापालिकेला बंधनकारक आहे. हा कालावधी पूर्ण झाल्यास पुन्हा पाइपलाइनच्या कामाला विलंब लागेल, अशी माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. टेंभुर्णीतील नुकसानीची रक्कम या भरपाईत धरलेली नाही, असेही सांगण्यात आले.

अगोदर भरपाई द्या, मगच काम करा

सोलापूर शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटावा या हेतूने स्मार्ट सिटीतून समांतर जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. फेब्रुवारी 2022 पर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. 110 किलोमीटरचे हे काम आता 25 ते 30 किलोमीटरपर्यंतच झाले आहे. ज्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनीतून पाइपलाइन जाणार आहे, त्या शेतकऱ्यांनी अगोदर भरपाई द्या, मगच काम सुरू करा, अशी भूमिका घेतल्याची माहिती स्मार्ट सिटीच्या अभियंत्यांनी दिली. दरम्यान, पाइपलाइनचे काम टेंभुर्णीपर्यंत आल्यानंतर पुन्हा नवा पेच निर्माण होऊ शकतो, असेही सूत्रांनी सांगितले. त्यामुळे आता भरपाईच्या रकमेची जुळवाजुळव महापालिका कशी करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

समांतर जलवाहिनीसाठी ज्या शेतकऱ्यांची जमीन बाधित होणार आहे, त्या 36 गावांमधील शेतकऱ्यांना 101 कोटी रुपयांची भरपाई द्यावी लागणार आहे. त्यासंदर्भात मागील आठवड्यात महापालिकेला कळविण्यात आले आहे.

- नागेश पाटील, उपजिल्हाधिकारी, भूसंपादन, सोलापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suchrita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

घर का न घाट का... उन्मुक्त चंदच ड्रीम झालं उद्ध्वस्त! गुजराती खेळाडू बनला World Cupमध्ये अमेरिकन संघाचा कर्णधार

Pratik Gandhi : प्रतीक साकारतोय गांधी ; हॅरी पॉटर फेम 'या' अभिनेत्याची सिनेमात वर्णी

Reels Addiction : इन्स्टाग्राम अन् यूट्यूबचं कशामुळे लागतंय व्यसन? जाणून घ्या कसं काम करतं अल्गोरिदम..

Rishabh Pant: "ऋषभ पंतसोबत लग्न कर, तो तुला खुश ठेवेल..."; नेटकऱ्याची कमेंट, उर्वशीनं अवघ्या दोन शब्दात दिलं उत्तर

SCROLL FOR NEXT