accident death solapur-pune highway
सोलापूर

विद्यापीठासमोर भीषण अपघात! कॉलेजला निघालेल्या अकरावीतील भाग्यश्रीचा मृत्यू; भरधाव कारची रिक्षाला धडक; दोनजण जखमी

शनिवारी (ता. २३) सकाळी साडेसातच्या सुमारास सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावर सोलापूर विद्यापीठासमोर हा भीषण अपघात घडला. भाग्यश्री निवृत्ती कांबळे (वय १७) ही अकरावीतील विद्यार्थीनी अपघातात ठार झाली आहे.

सकाळ ऑनलाईन

उत्तर सोलापूर : रिक्षाला मागून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने जोरदार धडक दिल्याने एका विद्यार्थिनीचा मृत्यू तर दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. शनिवारी (ता. २३) सकाळी साडेसातच्या सुमारास सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावर सोलापूर विद्यापीठासमोर हा भीषण अपघात घडला. भाग्यश्री निवृत्ती कांबळे (वय १७) ही अकरावीतील विद्यार्थीनी अपघातात ठार झाली आहे.

कोंडी येथून सोलापूर शहरात कॉलेजसाठी निघालेल्या रिक्षाला (एमएच १३, सीटी ९४७९) सोलापूर विद्यापीठासमोर राष्ट्रीय महामार्गावर पुण्याकडून सोलापूरकडे चाललेल्या कारने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की, यामध्ये बसलेली भाग्यश्री कांबळे ही विद्यार्थिनी रिक्षातून फेकली गेली. मुख्य रस्त्यावर असलेल्या रिक्षातून फेकली गेलेली भाग्यश्री सर्विस रस्त्यावर आपटली. यामुळे तिला गंभीर दुखापत झाली. त्याचबरोबर रिक्षात तिच्यासोबत असलेली तिची मैत्रीण ऐश्वर्या जगन्नाथ सोडगी (वय १९) ही या अपघातात गंभीर जखमी झाली आहे. तिच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याचबरोबर या अपघातात रिक्षात असलेला आदित्य सुनील भोसले (वय १४) हा आठवी शिकणारा विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी सोलापूर शहरातील अश्विनी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर ऐश्वर्या सोडगी हिच्यावर अश्विनी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच कोंडी येथील तरुणांनी जखमींना सोलापूर शहरातील रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच भाग्यश्रीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

कोंडीत हळहळ

भाग्यश्री कांबळे ही शहरातील गांधीनाथा कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. वडील निवृत्ती कांबळे हे शासकीय सेवेत चतुर्थश्रेणी कर्मचारी असून भाग्यश्रीला एक बहीण आहे. भाग्यश्रीच्या अपघाती मृत्यूमुळे कोंडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shendurwada News : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रयत्न; दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार प्रशांत बंब यांचे आश्वासन

Karad News : साताऱ्यातील तालुक्यात दुष्काळ जाहीर होण्यासाठी शंभूराज देसाई यांची थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे धाव

Ganeshotsav Dhol Tasha : गणेशोत्सवात मुळशीकर ढोल पथकांची कोट्यावधी रुपयांची कमाई; मुंबई, पुण्यात घुमला आवाज

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

SCROLL FOR NEXT