Death 
सोलापूर

उजनी धरणात बोट उलटून बाप-लेकाचा मृत्यू ! पत्नी व मुलीला वाचविण्यात यश; वांगी येथील घटना

अण्णा काळे

करमाळा (सोलापूर) : उजनी धरणात बोट उलटून अकलूज येथील बाप - लेकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता. 28) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास वांगी नंबर दोन व वांगी नंबर तीनच्या दरम्यान श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या जॅकवेलजवळ घडली. या घटनेत अकलूज येथील गुरुनगरातील रहिवासी विकास गोपाळ शेंडगे (वय 39) व त्यांचा मुलगा जय विकास शेंडगे (वय 13) यांचा बुडून मृत्यू झाला आहे. तर पत्नी स्वाती शेंडगे व मुलगी अंजली शेंडगे वाचली आहे. 

विकास शेंडगे हे सहकुटुंब केम येथे लग्नासाठी आले होते. केम येथील लग्न उरकून ते वांगी येथील मित्र जयवंत सातव यांच्याकडे आले होते. येथे आल्यानंतर जयवंत सातव यांच्या बोटीतून उजनीत फेरफटका मारावा म्हणून विकास शेंडगे हे आपली पत्नी, एक मुलगा व मुलगी यांच्यासह बोटीत बसले होते. बोट काही अंतरावर गेली असता उलटली. यात विकास शेंडगे व मुलगा जय शेंडगे यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. तर त्यांची पत्नी व मुलगी वाचले आहेत. 

बोट पलटी होताच आरडाओरडा सुरू झाल्याने जवळपास असलेल्या मच्छिमारांनी तत्काळ धाव घेत या लोकांना वाचविण्यासाठी सहकार्य केले. घटनेची माहिती समजताच नायब तहसीलदार विजयकुमार जाधव, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील जाधव यांनी घटनास्थळाला भेट दिली. विकास शेंडगे व जय शेंडगे यांचा मृतदेह मोस्टमॉर्टेमसाठी करमाळा येथील जिल्हा रुग्णालयात आणला होता. 

या घटनेबाबत रात्री उशिपर्यंत करमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. लग्नासाठी आलेल्या कुटुंबीयांवर ओढावलेल्या या घटनेमुळे अकलूज व केम येथे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut criticism government : सरकारच्या चुकीच्या नियोजनामुळे देश पुन्हा 'रॉकेलच्या रांगेत'; संजय राऊत यांचा घणाघाती प्रहार

Hardik Pandya ची मन जिंकणारी कृती; मुंबईच्या ग्राऊंड्समन्सना केली आर्थिक मदत... कारण ऐकून वाढेल आदर...

Latest Marathi News Live Update : पेट्रोलवरील उत्पादन शुल्कातील कपात ही सरकारच्या अपयशाचे निदर्शक- खासदार सागरिका घोष

Gold Rate Today: युद्धाचा आणि डॉलरचा सोन्यावर डबल इफेक्ट! मार्चमध्ये सोनं 30 हजारांनी स्वस्त; महाराष्ट्रात आजचा भाव किती?

West Asia crisis : महागाई वाढणार! आंतरराष्ट्रीय मालवाहतुकीच्या दरात मोठी वाढ, युद्धाच्या झळा सर्वसामान्यांना बसणार, जहाज वाहतुकीचा खर्च वाढला

SCROLL FOR NEXT