Dattatraya Shinde 
सोलापूर

मुले उच्चशिक्षित होईपर्यंत केला वडिलांनी जुन्या कपड्यांचाच वापर ! निराळे वस्तीतील दत्तात्रय शिंदे यांचा आदर्श

अमोल व्यवहारे

सोलापूर : राहण्यासाठी व्यवस्थित घर नसताना, मुलांना शिक्षण देणंही अवघड होतं. परंतु, मुलांचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत स्वतःसाठी नवीन कपडे घेतले नाहीत, जुन्याच कपड्यांवर दिवस काढले. पैसे नसल्यामुळे मुलांना शिकायला उगाचच घातले असे वाटायचे आणि मरणाचा विचारही डोक्‍यात जायचा. परंतु, आपल्यासारखे खस्ते खाण्याचे आयुष्य मुलांच्या वाट्याला येऊ नये म्हणून त्यांना शिकवण्याची जिद्द मनाशी गाठ बांधून होती. त्यातूनच पै- पै जुळवत दोन्ही मुलांना इंजिनिअर केले, तर मुलीला शिक्षिका केले. ही कहाणी आहे निराळे वस्ती येथील दत्तात्रय कृष्णा शिंदे या चप्पल शिवणाऱ्या कारागिराची. 

दत्तात्रय कृष्णा शिंदे यांचा जन्म निराळे वस्तीत 1953 मध्ये झाला. आठ ते नऊ वर्षांचा असतानाच शिंदे हे शाळेच्या वेळेअगोदर चप्पल पॉलिश करायचे आणि नंतर शाळेत जायचे. त्यांची शिक्षणातील आवड बघून बाहेरच्या लोकांनी त्यांना आर्थिक मदत करून शाळा शिकवले. जुन्या काळातील अकरावी पास व आयटीआयमधील फिटर कोर्स केलेले दत्तात्रय शिंदे हे विजयपूर रोडवरील आयटीआयला पायी चालत जात. त्यानंतर त्यांच्या मामांनी त्यांना मोडकीतोडकी सायकल घेऊन दिली. तीस रुपयांसाठी तिसऱ्या मजल्यावर पाणी भरायचं काम शिंदे यांनी केलं, तर एका सैनिक अधिकाऱ्याचे घर सांभाळले. शिक्षण घेताना लक्ष्मी-विष्णू मिलमध्ये त्यांना नोकरी लागली आणि जॉबर म्हणून ते काम करू लागले. 1991 मध्ये मिल बंद पडल्यावर पुढे काय करायचं, अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर त्यांनी आपला परंपरागत चप्पल-बूट तयार करण्याचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि घरातूनच चप्पल, बूट तयार करण्याचे काम सुरू केले. 

दरम्यान, त्यांचं लग्न रेणुका यांच्याशी झाल्यानंतर त्यांच्या घर- संसाराच्या वेलीवर संतोष आणि सचिन ही दोन मुलं, तर सारिका नावाची मुलगी अशी फुलं बहरली. वडिलांना हातात दिवसभर राफी घेऊन काम करताना बघत-बघतच ही मुलं लहानाची मोठी झाली. या मुलांना आपल्यासारखे जीवन जगण्याचे कष्ट येऊ नये, म्हणून शिंदे यांनी त्यांना चांगले शिक्षण देण्याचा निर्धार केला. ओळखीपाळखीने दोन्ही मुलांना हरिभाई देवकरण प्रशालेत तर मुलीला सेवासदन प्रशालेत पाठवले. या मुलांनीदेखील अतिशय जिद्दीने, चिकाटीने चांगला अभ्यास करून आई-वडिलांचा विश्वास सार्थ केला. संतोष आणि सचिन या दोघांनी इंजिनिअरिंग पूर्ण करून सध्या मोठ्या कंपन्यांमध्ये चांगल्या हुद्‌द्‌यावर कार्यरत आहेत. तर मुलगी सारिका सपताळे हिने बीए बीएड पूर्ण करून सध्या त्या राजश्री शाहू महाराज हायस्कूल, विडी घरकुल येथे प्रभारी मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहे. 

घर बांधल्यानंतर कित्येक वर्षे घरात फरशी नव्हती, असे शिंदे आवर्जून सांगतात. शिंदे हे सध्या आपली बहीण व आपली मुलगी, नातवंडे यांच्यासोबत राहतात. तर एक मुलगा पुणे आणि दुसरा उदयपूर येथे त्यांच्या कुटुंबासमवेत राहतात. बहिणीच्या पतीच्या व मुलीच्या पतीच्या निधनानंतर या दोघींनाही शिंदे सांभाळत असून, हे एका लहानशा घरामध्ये इतके मोठे कुटुंब सांभाळण्याची कसरत शिंदे यांना आताही करावी लागत आहे. आपण आपला व्यवसाय सांभाळत मुलांना चांगल्या प्रकारे शिक्षण देऊन आयुष्यात उभे करता आल्याबद्दल अतिशय समाधान व्यक्त करताना शिंदे यांनी माजी सैनिक अधिकारी शिरसीकर, डॉ. प्रल्हाद शेळवणे, माजी महापौर मनोहर सपाटे यांनी वेळोवेळी केलेल्या मदतीबाबत उल्लेख करतात. 

आमच्या वडिलांना आम्ही कधीही नवीन कपडे घातलेले पाहिलेच नाही. जुने कपडे घातलेले पाहिले. परंतु जुने कपडेदेखील ते टापटीपपणे वापरतात. त्यांच्याकडे पाहतच आम्ही लहानाचे मोठे झालो. वडिलांना भेटत गेलेल्या चांगल्या संगतीमुळे त्यांच्या वागणुकीमध्ये चांगला परिणाम झाला आणि आमचे आयुष्य चांगल्या पद्धतीने सुधारले. शिक्षणाने फुलत गेले. दिव्यांगांच्या पायांनादेखील चपला शिवून देण्याचे काम वडील अतिशय सुरेखपणे करीत आहेत. त्यामुळेच त्यांना आदर्श पालक पुरस्कार देऊन गौरव केला आहे. 
- सारिका शिंदे-सपताळे 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bigg Boss Marathi 6 Video : भाऊच्या धक्क्यावर विशाल-अनुश्रीला चांगलंच झापलं; "Women Card वापरून तुम्ही.."

Astrology: ‘या’ ५ राशींच्या व्यक्ती खोटं बोलण्यात पटाईत असतात, नातं वाचवण्यासाठी पार्टनरपासून सत्य लपवतात, जाणून घ्या कोणत्या?

Latest Marathi news Live Update : हैदराबादच्या नामपल्लीमध्ये आग लागली

Mumbai: मुंबईच्या पाणीपुरवठ्यात क्रांती? अनेक भागांना जोडणारे नवे बोगदे प्रस्तावात; यादी आली समोर, जाणून घ्या...

Mahad News : कशेळीचा कनकादित्य! 1300 वर्षा पूर्वीची अखंड सूर्य उपासनेची परंपरा उलगडली

SCROLL FOR NEXT