Wild Animals 
सोलापूर

ना वाळूजकडे ना देगावकडे ना मुंगशीकडे, मग गेला बिबट्यासदृश प्राणी कुणीकडे? 

रमेश दास

वाळूज (सोलापूर) : बिबट्यासदृश प्राण्याने 26 जानेवारी रोजी केलेल्या हल्ल्यात वाळूज (ता. मोहोळ) येथील दहा वर्षे वयाच्या मुलाचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे मोहोळ तालुक्‍यातील वाळूज, देगाव, मनगोळी, भैरववाडी, नरखेड (ता. मोहोळ) परिसरासह शेजारील बार्शी, माढा, उत्तर सोलापूर तालुक्‍यातील वाळूज शिवारा शेजारी शेती असलेल्या शेतकऱ्यांमध्ये व मजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. ही घटना घडून पंधरा दिवस उलटले, मात्र त्यानंतर हा हल्ला करणारा प्राणी ना कोणाला दिसला ना त्याच्या पायाचे ठोस ठसे वनविभागाला मिळाले. 

त्या तथाकथित प्राण्याने एखाद्या जनावरावर, वासरावर, शेळी, मेंढी किंवा कुत्रा यांच्यावर हल्ला केलेला नाही. म्हणून "ना वाळूजकडे ना देगावकडे ना मुंगशीकडे; मग हा बिबट्यासदृश प्राणी गेला कुणीकडे?' अशी चर्चा आता वाळूज, देगाव परिसरासह संपूर्ण तालुक्‍यात होत आहे. अनिकेत अमोल खरात (वय 10) असे त्या घटनेत मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. घटना घडल्यानंतर (26 जानेवारी) उपचारासाठी मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात त्याला आणले असता, डॉक्‍टरांनी तपासणी करून त्यास मृत घोषित केले होते. या घटनेची नोंद मोहोळ पोलिसांत झाली आहे. गावच्या पोलिस पाटील अर्चना अनिल कादे, गाव कामगार तलाठी श्री. पारडे यांना या घटनेची माहिती देण्यात आली होती. घटनेचा पुढील तपास नरखेड पोलिस ठाण्याचे ठाणे अंमलदार गणेश पोफळे करीत आहेत. 

ठळक मुद्दे... 

  • वन विभागाच्या अधिकाऱ्यांना जेव्हा समजले तेव्हा ते तातडीने घटनास्थळी पोचले तेव्हा बऱ्यापैकी अंधार पडला होता. 
  • बॅटरीच्या प्रकाशात त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली असता कोणत्या प्राण्याने हल्ला केला हे निश्‍चित समजू शकले नव्हते. 
  • दुसऱ्या दिवशी सकाळी वनखात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुन्हा पाहणी केली होती. 
  • घटनास्थळी मोठा रक्तस्राव झाला होता. 
  • अनिकेतच्या डोक्‍याच्या मागील बाजूस खोल मोठ्या दोन खुणा होत्या व डोक्‍याच्या वरील बाजूस फाटल्या सारख्या दोन-तीन खुणा होत्या. 

बिबट्यासारखा मार्जर कुळातील प्राणी त्याच्यापेक्षा उंचीने कमी असलेल्या प्राण्यावर किंवा प्राणी समजून लहान मुलांवर हल्ला करतो; मात्र शिकार पकडताना तो भक्ष्याची मान पकडतो, डोके पकडत नाही. 
- भरत छेडा, 
नेचर कॉन्झर्वेशन सर्कल, सोलापूर 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT