Savkari 
सोलापूर

खासगी सावकारांच्या धमक्‍यांना कंटाळून शेतकऱ्याने केला आत्महत्येचा प्रयत्न

मिलिंद गिरमे

लवंग (सोलापूर) : मौजे वाफेगाव (ता. माळशिरस) येथील मोहन शिवाजी मदने यांनी खासगी महिला सावकाराने केलेल्या पैशाच्या मागणीच्या तगाद्यामुळे कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला. 

मोहन मदने (वय 57) यांनी मुलीच्या लग्नासाठी व जावयाच्या दवाखान्यासाठी वाफेगाव येथील महिला सावकार रुक्‍मिणी मुकुंद शिंदे, मुकुंद शिंदे, अमोल शिंदे, चंद्रशेखर शिंदे तसेच पंढरपूर तालुक्‍यातील टाकळी येथील माधुरी रविकुमार आणि कान्हापुरी येथील ईश्वर काळेल यांच्याकडून 2010 आणि 2011 मध्ये टप्प्या-टप्प्याने 14 लाख 99 हजार रुपये घेतले होते. त्या पैशापोटी तारण म्हणून मोहन मदने यांच्याकडून वाफेगाव येथील साडेचार एकर शेतजमीन या मंडळींनी खरेदी करून घेतली होती. आजपर्यंत ही शेतजमीन मोहन मदने हे स्वतःच वाहिवाटत असत. ही जमीन व्यवहार पूर्ण केल्यानंतर परत देण्याचे ठरले होते. 

आजपर्यंत मदने यांनी व्याजापोटी 8 लाख 50 हजार रुपये परत केले होते. तरीही या सावकारांनी मोहन मदने यांना 76 लाखांची मागणी करून "लॉकडाउन सुरू झाल्यापासून तुझ्या शेताचा कब्जा सोड, तू रानात यायचे नाही, आलास तर तुला जिवे मारू' अशी धमकी दिली होती व मारहाणीचा प्रयत्न केला होता. त्यामुळे या जाचास कंटाळून मोहन मदने यांनी 29 सप्टेंबर 2020 रोजी आपल्या राहत्या घरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. वेळीच घरातल्या व नातेवाईक यांनी खासगी दवाखान्यात दाखल करून औषध उपचार केल्याने त्यांचे प्राण वाचले. मात्र, ते सहा दिवस बेशुद्ध होते. 

शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी 5 ऑक्‍टोबर रोजी रात्री सावकाराच्या धमकीस कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद अकलूज पोलिस स्टेशनला दिली. हवालदार शेख पुढील तपास करीत आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Road Accidents Reduction : २०३० पर्यंत रस्ते अपघात ५० टक्क्यांनी कमी होणार? ; राज्यसभेत गडकरींनी दिली महत्त्वपूर्ण माहिती

Pune Mumbai Expressway Traffic : द्रुतगती मार्गावरील अपघाताचा फटका; पुणे-बंगळूर महामार्गावर अवजड वाहतूक ठप्प

T20 World Cup: इशान किशनच ओपनर! सूर्याचा विश्वास पठ्ठ्याने सार्थ ठरवला, 7 Six अन् फिफ्टी; संजूचे स्थान धोक्यात

Pune Crime : मैत्रिणीला फोन केल्याच्या वादातून तरुणावर कोयत्याने हल्ला

Jan Arogya Yojana : राज्‍यातील उपकेंद्र, प्राथमिक आरोग्‍य केंद्रातही महात्‍मा फुले योजना; आता बाह्यरुग्ण विभागातील उपचारही मिळतील मोफत

SCROLL FOR NEXT