सोलापूर

#Solapur : जिल्हा सरकारी वकील पदासाठी महाविकास आघाडीच्या समर्थकांची फिल्डिंग

परशुराम कोकणे

सोलापूर : विद्यमान जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत यांची मुदत आणखी दोन महिने असली तरी या पदासाठी इच्छुक असलेल्या वकिलांनी आतापासूनच फिल्डिंग लावायला सुरवात केली आहे. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असल्याने शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस पक्षाच्या जवळच्या वकिलाला ही संधी मिळू शकते, अशी चर्चा आहे. 

प्रदीपसिंह राजपूत पुन्हा एकदा इच्छुक
जिल्हा सरकारी वकील पदासाठी शिवसेना महिला जिल्हाप्रमुख अस्मिता गायकवाड यांचे पती, शिवसेनेचे समर्थक ऍड. सुरेश गायकवाड, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे समर्थक ऍड. बाबासाहेब जाधव, ऍड. महेश जगताप, कॉंग्रेसचे समर्थक ऍड. जहीर सगरी यांची नावे चर्चेत आहेत. इच्छुकांनी आपापल्यापरीने फिल्डिंग लावायला सुरवात केली आहे. विद्यमान जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत हे पुन्हा एकदा इच्छुक आहेत. गेल्या दोन वर्षांत 69 जन्मठेपेच्या शिक्षा दिल्या आहेत. जलदगतीने न्याय मिळवून दिला आहे. वकिलांसाठी कार्यशाळा घेतली आहे, त्यामुळे मला पुन्हा संधी मिळू शकते असे त्यांचे म्हणणे आहे. 

25 एप्रिल 2020 पर्यंत मुदत
माजी जिल्हा सरकारी वकील आणि सध्या खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी यांच्या जवळ असलेले ऍड. संतोष न्हावकर हे स्वत: इच्छुक नसले तरी आपल्या जवळच्या वकील मित्रांसाठी प्रयत्नशील असल्याची चर्चा आहे. जिल्हा सरकारी वकील राजपूत यांची मुदत 25 एप्रिल 2020 पर्यंत आहे. ही मुदत संपण्यापूर्वी जिल्हा सरकारी वकील पदाची निवड प्रक्रिया राबविणे बंधनकारक आहे. सर्वात आधी शासनाकडून नोटिफिकेशन निघेल. त्यानंतर इच्छुक वकिलांचे अर्ज मागविले जातील. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून मुलाखत प्रक्रिया राबविली जाईल. त्यानंतर तिघांची नावे मंत्रालयात पाठविले जातील. उच्चस्तरीय समितीकडून नाव निश्‍चित करून विधी व न्याय विभागाला कळविले जाते, अशी ही प्रक्रिया आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा M. Chinnaswamy Stadium वरील हा शेवटचा सामना कसा? नेमकी भानगड काय? Explained

IPL 2026 Point Table: विराट कोहलीचे शतक हुकले, देवदत्त पडिक्कलने चागंलेच झोडले; RCB चा घरच्या मैदानावरील शेवटच्या लढतीत विजय

Paytm Bank: पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द! वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार? पेमेंट करता येणार का? जाणून घ्या...

Manohar Mama Arrested: आणखी एका बाबाला अटक! स्वतःला बाळूमामाचा अवतार सांगायचा; कुर्डुवाडीत गुन्हा दाखल

RCB vs GT Live: विराट कोहलीने इतिहास रचला! IPL मध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज ठरला; गेल, रोहितच्या यादीत स्थान

SCROLL FOR NEXT