Police 
सोलापूर

सोलापूर पोलिस अधीक्षकपदासाठी 15 जणांची फिल्डिंग ! वजनदार नेत्याच्या माध्यमातून दोन वरिष्ठ मंत्र्यांकडे वाढले हेलपाटे 

तात्या लांडगे

सोलापूर : ग्रामीणचे पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांची नगरला बदली झाली आहे. त्यांच्या जागी नवा अधिकारी कोण येणार, याची सोलापूरकरांना उत्सुकता लागली आहे. सहा महिने उशिराने झालेल्या बदल्यांमुळे बहुतांश अधिकाऱ्यांनी बदलीच्या ठिकाणी जाऊन पदभार स्वीकारला आहे. मात्र, जिल्ह्यातील वजनदार नेत्याच्या माध्यमातून सुमारे 15 पोलिस अधिकाऱ्यांनी सोलापूर ग्रामीणसाठी मंत्रिमंडळातील दोन वरिष्ठ ज्येष्ठ मंत्र्यांकडे फिल्डिंग लावण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. 

राज्यातील पोलिस अधीक्षक, पोलिस आयुक्‍त, अप्पर पोलिस अधीक्षक, सहायक पोलिस आयुक्‍त, उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांसह जिल्हा शल्य चिकित्सकांच्या नुकत्याच बदल्या करण्यात आल्या आहेत. वास्तविक पाहता या बदल्या सहा महिन्यांपूर्वीच होणे अपेक्षित होते. मात्र, राज्यातील कोरोना संसर्गाची स्थिती पाहता यंदा बदल्यांसाठी काही महिने विलंब झाला. बदल्यांची चाहूल लागताच काही अधिकारी त्यांना पाहिजे त्या ठिकाणी पोस्टिंग मिळावी, त्यासाठी विविध पद्धतीने प्रयत्न करतात. 

सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांची बदली नगरला पोलिस अधीक्षकपदी झाली. तत्पूर्वीच, सोलापुरात पोस्टिंग मिळावी म्हणून 15 अधिकाऱ्यांनी संबंधित जिल्ह्यातील वजनदार नेत्यांकडे संपर्क केल्याची चर्चा आहे. मात्र, अधिकाऱ्यांच्या बदल्यात कसलाही रस नसलेल्या त्या नेत्यांनी सकारात्मकता दाखविली नाही. मात्र, त्यांनी अधिकाऱ्यांना अपेक्षित ठिकाणी बदली मिळवण्याचा मार्ग दाखविल्याचीही चर्चा आहे. आता सोलापूरवर प्रेम करणारे ज्येष्ठ मंत्री अधीक्षकपदी कोणता अधिकारी देणार, याचीही उत्सुकता आहे. 

मुख्यमंत्र्यांच्या टेबलावरच अडकली प्रतीक्षा यादी 
सोलापूरसह अन्य काही जिल्ह्यांतील तथा शहरात वरिष्ठ अधिकारी म्हणून पोस्टिंग मिळावी म्हणून राज्याच्या मंत्रिमंडळातील दोन वरिष्ठ मंत्र्यांनी काही अधिकाऱ्यांची नावे मुख्यमंत्र्यांना कळविली आहेत. संबंधित अधिकाऱ्यांचा त्या जिल्ह्यासाठी विचार व्हावा, अशी चिठ्ठीही त्यासोबत जोडली आहे. आयपीएस तथा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या मुख्यमंत्र्यांकडून होत असल्याने काही अधिकाऱ्यांची बदली झाली, परंतु त्यांना पोस्टिंग मिळालेली नाही. वरिष्ठ मंत्र्यांनी पाठविलेल्या चिठ्ठीवर मुख्यमंत्री कार्यालयाकडून अद्याप काहीच निर्णय न झाल्याने सोलापूरच्या पोलिस अधीक्षकपदासाठी आणखी वाट पाहावी लागेल, अशीही चर्चा आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT