Jail 
सोलापूर

"और हड्डी गले में फंस गई'प्रकरणी बोकडाच्या जेवणाच्या आयोजकासह "हात धुतलेल्यां'विरुद्धही गुन्हा दाखल !

अभय जोशी

पंढरपूर (सोलापूर) : बोकाडाच्या जेवणा प्रकरणी अखेर आयोजक शिवाजी बळिराम भोसले, त्याचा जेलमध्ये असलेला भाऊ तानाजी याच्यासह मंगळवेढा येथील पोलिस बजरंग माने आणि उदय ढोणे यांच्या विरोधात तलाठ्यींनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. काल (गुरुवारी) या प्रकरणातील दोन्ही पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर बोकडाच्या जेवणात हात धुतलेल्या 30 ते 40 गावकऱ्यांविरुद्धही गुन्हा दाखल झाल्याने मंगळवेढा व पंढरपूर शहर-तालुक्‍यात खळबळ उडाली आहे. 

पंढरपूर तालुक्‍यातील आंबे गावात 17 जुलै रोजी आरोपी शिवाजी बळिराम भोसले याने शासकीय आदेशाचे उल्लंघन करून साथीच्या रोगाचा फैलाव होईल याची कल्पना असतानासुद्धा जाणीवपूर्वक बोकड कापून जेवणाचा कार्यक्रम ठेवला. त्या जेवणाच्या कार्यक्रमाला गावातील सुमारे 30 ते 40 लोक उपस्थित राहिले. त्याचप्रमाणे मंगळवेढा येथील सब जेलमधील खुनाच्या आरोपाखाली अटकेत असलेला कैदी तानाजी बळिराम भोसले याच्यासह मंगळवेढा पोलिस ठाण्याचे पोलिस उदय ढोणे आणि बजरंग माने यांनाही जेवणासाठी बोलावले होते. गावामध्ये साथीचे रोग फैलावतील अशी कृती केली, अशा आशयाची फिर्याद तलाठी प्रकाश गुजले यांनी पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. 

या प्रकरणी बोकाडाचे जेवण ज्यांनी आयोजित केले होते ते शिवाजी भोसले, कैदी तानाजी भोसले, पोलिस बजरंग माने, उदय ढोणे तसेच गावातील 30 ते 40 लोकांच्या विरोधात पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्यासह अन्य काही कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पंढरपूर तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक किरण अवचर पुढील तपास करीत आहेत. काल (गुरुवारी) या प्रकरणातील दोन्ही पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा; २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा

IMD Weather Alert : पुढील 20 तासांत 25 राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; वाऱ्याचा वेग ताशी 75 किमीपर्यंत जाण्याची शक्यता, महाराष्ट्रातील विदर्भातही पावसाचा जोर

Rohit Sharma Dance: रोहितने माहोल बनवला... Treding गाण्यावर डान्सिंग मुव्ह; मित्रालाही शिकवले... Video Viral

'येतेच आता मी नांदायला'! स्टार प्रवाहनंतर येतेय झी मराठीची नवी मालिका; मुख्य अभिनेत्रीचं नाव ऐकूनच लागेल ठसका

SCROLL FOR NEXT